Farmer: भीषण वास्तव! शिंदे सरकारच्या काळात आत्महत्येचं प्रमाण वाढलं; दररोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शिंदे सरकारच्या काळात मराठवाड्यात रोज सरासरी ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं दिसून आलंय.
Farmer
FarmerSaam TV
Published On

माधव सावरगावे

Farmer: शिंदे सरकारच्या काळात मराठवाड्यात रोज सरासरी ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं दिसून आलंय. वर्षभराच्या काळात ५१% आत्महत्या एकनाथ शिंदे सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी केलेला महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा संकल्प सपशेल फेल ठरला आहे.

या वर्षांच्या १९ महिन्यांत मराठवाड्यात ९४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ४७६ (५०.६०%) शिंदे- फडणवीस सरकारच्या काळातल्या आहेत. म्हणजेच सरकारच्या ६ महिन्यांच्या कार्यकाळात सरासरी महिन्यात २५ शेतकऱ्यांचा बळी गेला. या पैकी २७% एकट्या बीड (Beed) जिल्हात आत्महत्या झाल्या असून त्यापाठोपाठ औरंगाबाद, नांदेड आणि जालना जिल्ह्याचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांचे २२७५ कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत. (Latest Marathi News)

विदर्भात ९४० आत्महत्या राज्यात २०१२ दरम्यान २००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी फक्त ६५२ कुटुंबीयांना मदत पोहोचली आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. सतत असलेली नापिकी आणि डोक्यावर उभा असलेला कर्जाचा डोंगर यामुळे अनेक शेतकरी स्वत:चे जीवण संपवण्याचा निर्णय घेत आहेत.

Farmer
Farmers Protests : सडलेल्या संत्र्यांचा हार गळ्यात टाकून तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

बाजारात अन्नधान्याच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. मात्र तरी याचा योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अशात १६ डिसेंबर रोजी देखील सततच्या नापिकीला कंटाळून ५६ वर्षीय एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला. नापीक आणि कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुख:चा मोठा डोंगर कोसळला आहे. सुभाष भागोजी राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री त्यांनी संपूर्ण कुटुंबाबरोबर जेवण केले. १२ नंतर सर्व झोपलेले असताना त्यांनी स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रात्री त्यांनी घराच्या स्लॅबला असलेल्या हुकात रशी टाकून गळफास लावून घेतला.

Farmer
Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुलढाण्यातील लोणार(Lonar) तालुक्यातील गोवर्धन नगरात देखील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. संदिप रमेश चव्हाण (वय ४२, रा. गोवर्धन नगर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप चव्हाण हे त्याच्या वसंतनगर शिवारातील शेतात सोयाबीन जमा करण्यासाठी गेले होते. यंदा सुरुवातीला झालेला अपुरा पाऊस आणि सोंगणीच्या वेळी झालेली अतिवृष्टी यामुळे सोयाबीनचे गणित हुकले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याच कारणाने त्यांनी आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com