Mango Juice Saam Tv
महाराष्ट्र

Mango Juice: तुम्ही खाताय आमरस की विष? तुमच्या मँगो ज्युसमध्ये केमिकल्स? 32 टन भेसळयुक्त मँगो प्लप जप्त

Food Safety Alert: मँगो ज्युसमध्ये केमिकल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 32 टन भेसळयुक्त मँगो प्लप जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे मँगो ज्युस पिताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात ३२ टन भेसळयुक्त मँगो पल्प जप्त

  • केमिकल्स आणि बनावट रंगांचा वापर

  • FDA कडून मोठी कारवाई

  • ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणामाची शक्यता

रोहित कदम, साम टीव्ही

उन्हाळ्यात चवीनं तुम्हीही मँगो ज्युस पिताय? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मँगो ज्युसमध्ये केमिकल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन कसं अॅक्शन मोडवर आलंय ? नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कसा ऐरणीवर आलाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

हे आहे मॅंगोपल्प. या मॅगोपल्प पासूनच ज्युस, जाम.आमरस अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात..मात्र हे मॅगो पल्प केमिकलयुक्त आहे.. पुण्यात सध्या उन्हाळी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध विभागानं तब्बल 3२ हजार किलो भेसळयुक्त मँगो प्लप जप्त केलंय.

अन्न- औषध विभागाच्या तपासणीअंतर्गत 'मे. मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम' या दुकानात अवैधरित्या भेसळयुक्त मँगो पल्प तयार होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.तिथे धाड टाकली असता अनधिकृत रंग आणि इतर पदार्थांचा वापर करून मँगो पल्प तयार केलं जात असल्यांच उघडकीस आलं.या कारवाईत तब्बल 2 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार काही पहिलाच नाहीये. प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होऊनही हे प्रकार धडधडीतपणे सुरू असतात. याआधीदेखील मुंबईतही 11 हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होत. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातल्या मावळ आणि खेडमध्ये भेसळयुक्त पदार्थ बनवणारं रॅकेट एफडीएनं उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर सरकार कसा चाप लावणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : प्रस्थापित राजकीय पक्षाला जोरदार झटका; ४ आमदारांचे तडकाफडकी राजीनामे, तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: हिंगोलीत डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करणारा

Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयातून थरार! पत्नी आणि वडिलांवर झाडल्या गोळ्या; संतापाच्या भरात मुलाकडून दुहेरी हत्या

Chanakya Niti: तोंडात गोड, मनात विष! धोकेबाजांना कसं ओळखायचं? चाणक्यांनी दिल्या माणूस ओळखण्याच्या ४ टिप्स

LPG Rule Change: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT