Manasvi Choudhary
उन्हाळ्यात अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात पोटाच्या समस्या उद्भवतात. वाढत्या उष्णतेमुळे आम्लपित्त, पोट फुगणे या समस्या निर्माण होतात.
मात्र या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही केवळ औषधे नाही तर घरगुती ड्रिंक प्या.
लिंबू, हिंग, काळी मिरी याचा उपयोग आयुर्वेदात केला जातो. लिंबाचा रस, हिंग, काळी मिरी आणि कोमट पाणी हे साहित्य मिक्स करून तुम्ही ड्रिंक बनवू शकता.
कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने पोटफुगी कमी होण्यास मदत होते. पोटातील आम्ल कमी करते.
पोटफुगी झाली असेल तर तुम्ही कोमट पाण्यात काळी मिरी पावडर मिक्स करून हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
हिंग हे गॅस, अपचन आणि पोटफुगीवर आयुर्वेदिक उपाय आहे. पचनशक्ती सुधारण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.