Manasvi Choudhary
गळ्यातील मंगळसूत्राच्या एकापेक्षा एक युनिक डिझाइन्स सध्या पाहायला मिळत आहेत. सिंपल ते डिझाईनर मंगळसूत्राचे डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करा. लेटेस्ट पॅटर्न पाहूया.
सिंपल चैन आणि काळे मणी मंगळसूत्रात तुम्ही डायमंडचे पेडंट ही डिझाईन तुम्ही निवडू शकता.
फ्लोरल मंगळसूत्र कायमच ट्रेंडमध्ये असते. अमेरिकन डायमंडमध्ये हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता ज्यामध्ये फुलांच्या आकाराचे पेंडट असते.
आजकाल तरूण मुली ऑफिससाठी, डेली वेअरसाठी खास छोटे मंगळसूत्र निवडतात त्यासाठी तुम्ही अशी डिझाईन निवडू शकता.
मंगळसूत्राच पतीचे नाव असावे यासाठी तुम्ही खास पतीच्या नावाचे मंगळसूत्र बनवून घ्या. नावाची स्पेलिंग किंवा नावाचे पहिले अक्षर हे पेडंट बनवा.
मंगळसूत्र दोन पदरी मंगळसूत्राचा हा पॅटर्न खुप सुंदर आणि आकर्षक आहे. खास साडीलूकवर तुम्ही हा पॅटर्न ट्राय करू शकता.
कुंदन खंड्याचे मंगळसूत्र घालायला महिलांना आवडते. चकाकी आणणारे हे मंगळसूत्र स्टायलिश, डिझायनर साड्यांवर छान दिसते.
काळेमणी मंगळसूत्र सिंपल पेडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही खास डेलीवेअरसाठी निवडू शकता.
मोर डिझाईन मंगळसूत्र युनिक पॅटर्नचे आहे. हे पेंडट तुमच्या नात्यातील प्रेम वाढवते.