TUKARAM MUNDHE'S FDA RAID: BAKERY LICENSE SUSPENDED OVER HYGIENE VIOLATIONS AND EXPIRED FOOD STOCK saam tv
महाराष्ट्र

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

FDA Raid On Iyengar Bakery: लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील 'बेंगलोर अय्यंगार बेकरी'वर एफडीए अधिकाऱ्यांनी मोठी धाड टाकली. अस्वच्छता आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आल्याने बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

Bharat Jadhav

  • रेणापूर येथील बेंगलोर अय्यंगार्स बेकरीवर एफडीएची धाड टाकण्यात आली.

  • तपासणीत अस्वच्छता आणि एक्सपायर माल आढळल्याचा आरोप करण्यात आला.

  • अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित केला.

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून एफडीएनं राज्यभरात कारवाईचा धडाका लावालाय. एफडीएनं लातूर जिल्ह्यातील दुकानांवर धाडी टाकल्या आहेत. या धाड सत्रांमुळे रेणापूर येथील अन्नपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. लातूरमधील रेणापूर येथील प्रसिद्ध 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी'वर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत एक धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे रेणापूर परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय.

रेणापूरमधील महात्मा गांधी चौक भागात ही बेकरी आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकानं बेकरीत धाड टाकताच तेथील भीषण परिस्थिती पाहून अधिकारीही चक्रावलेत. बेकरीमधील अत्यंत गलिच्छ वातावरणात ग्राहकांसाठीचे अन्नपदार्थ बनवले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले. या तपासणीदरम्यान चक्क मुदतबाह्य कच्चा माल वापरून बेकरीचे विविध पदार्थ तयार केले जात असल्याचे बाब उघडकीस आली.

या बेकरीमध्ये कोणत्याच प्रकारची स्वच्छता ठेवली जात नसल्याचं लक्षात आलं. बेकरी चालकाचा हा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन पाहता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कडक या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. तसेच या बेकरीचा संपूर्ण व्यवसाय तातडीने बंद पाडत प्रशासनाच्या वतीने दुकान सील करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे रेणापूरमधील इतर व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्नपदार्थ विक्रेत्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

शिंदे घराण्याची 500 वर्ष जुनी 3000 किलोची तोफ चोरीला; दरोडेखोर घेऊन आले होते ट्रक अन् क्रेन

Women Weight Loss: योगा किंवा एक्सरसाईज न करताही कमी करा वजन; महिलांनी फक्त फॉलो करा हे सोपे डाएट टिप्स

Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

SCROLL FOR NEXT