Seena 
महाराष्ट्र

नगरमध्ये सीना नदीला पूर, शेवगावात ढगफुटी

Ashokraje Nimbalkar

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, काल रात्रीपासून जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. शेवगाव, पाथर्डी, नगर आणि कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीना नदीसह अनेक नद्यांना पूर आला आहे. शेवगावातील अनेक गावांत पाणी शिरले आहे.

नगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. नगर तालुक्यातील उत्तरेकडील भागात अतिवृष्टी झाल्याने पिंपळगाव माळवीसह परिसरातील तलाव तुडुंब झाले आहेत.Flood of Sina river in Nagar district

शेवगाव तालुक्यातील कोरडगाव, आखेगाव, पागोरी पिंपळगाव, वाळुंज, खरडगाव, वरूर, भगूर आदी गावांत नदीचे पाणी शिरले आहे. या पावसाने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. उडदाची काढणी सुरू असतानाच पाऊस आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

तिसगाव, मिरी व करंजी परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने या भागातील सर्वच तलाव, बंधारे व नाला बांध पूर्ण भरले आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. मढी, शिरापूर आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे वृद्धा नदीला आलेल्या पुरामुळे तिसगावमधील बाजार तळावरील करुणेश्वर मंदिरात पाणी घुसले. Flood of Sina river in Nagar district

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसची भिंत कोसळली आहे, तर स्मशानभूमीची भिंत पडली आहे. तिसगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाची आंबी तलाव व खारोळ नाला तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्या वरच्या भागात असलेले दोन बंधारे फुटल्यामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला होता, त्यामुळे मिरी-तिसगाव वाहतूक काही तासासाठी बंद होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT