चंद्रकांतदादांची पाठ फिरताच भाजपचे "चाणक्य" राष्ट्रवादीत

राष्ट्रवादी लोगो
राष्ट्रवादी लोगो

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी नगर पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतर सुरू झाले आहे. आमदार रोहित पवार यांच्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून पवार यांनी मतदारसंघात आपली कमांड निर्माण केली. दोन्ही तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी चुणूक दाखवली. नगर पालिकेतही त्यांनी सत्तांतर घडवून आणले. एकेक करीत राम शिंदे यांचा प्रभाव कमी करण्याच तंत्र अवलंबले आहे.Four members of the Bharatiya Janata Party join the NCP

सत्तास्थाने काबीज केल्यानंतर त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. भाजपतील नेत्यांनी आपल्या गोटात घेण्यासाठी काही डावपेच आखले आहेत. त्या डावपेचाला काल मूर्त रूप आले. भाजपचे चाणक्य समजले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश करून राम शिंदे यांना धक्का दिला आहे. ढोकरीकर हे भाजपचे सरचिटणीस होते. सुरूवातीपासून त्यांनी भाजपसाठी काम केले असल्याने हा मोठा धक्का मानला जातो.

राष्ट्रवादी लोगो
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

मतदारसंघात कोणती रणनीती आखायची यासाठी ते चाणक्य म्हणून ओळखले जात. अगदी सदाशिव लोखंडे आमदार होण्यापूर्वीपासून ते हे काम करीत होते. सदाशिव लोखंडे यांची पंधरा वर्षे आणि राम शिंदे यांची दहा वर्षे त्यांनी हे काम केले.

विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्जतमध्ये येत नगरसेवकांसोबत चर्चा केली होती. त्यांची पाठ फिरताच भाजपचे निष्ठावान राष्ट्रवादीत गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

ढोकरीकर यांच्यासह नगरसेवक लालासाहेब शेळके, देविदास खरात व नगरसेविका पूत्र नितीन तोरडमल यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

आमदार रोहित पवार यांचे हस्ते व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे, उद्योजक संतोष नलवडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीला निवडणूक सोपी नाही

कर्जत तालुक्यात आमदार पवार यांनी बहुतांशी सत्ताकेंद्र हाती घेतली असली तरी आगामी नगर पंचायत निवडणूक सहज सोपी नाही. कर्जत शहरात भाजपची ताकद माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या रूपाने आहे. ती ताकदच आपल्या बाजूने घेण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. आज जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांच्या विकासनिधीतून विविध विकासकामांचे उदघाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. ते नेमके काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Four members of the Bharatiya Janata Party join the NCP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com