घनसावंगी पोलीस ठाणे, जालना लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जालना: जेवणासाठी मासे वाढले नाही म्हणून जमिनीवर आपटून खून! तिघांना जबर मारहाण

आरोपीकडून तिघांना जबर मारहाण....

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: घनसावंगी तालुक्यातल्या रामटेकडी वस्ती पिंपरखेडा बुद्रुक या ठिकाणी जेवणात मासे वाढले नाही पाहून मारोती होनाजी नरोटे या (65) वर्षीय इसमाचा जमीवर आपटून आणि लोखंडी फुकणीने वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

घनसावंगी तालुक्यातल्या रामटेकडी वस्ती पिंपरखेडा बुद्रुक याठिकाणी रविवार असल्याने मारोती होनाजी नरोटे, त्यांचा मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांनी मासे खाण्याचा बेत आखला होता. रात्री मासे खात असतांना त्या ठिकाणी पांडुरंग ज्ञानदेव हांगे हा व्यक्ती दाखल झाला.

जेवणासाठी मासे वाढण्याचा हट्ट;

मला पण जेवण्यासाठी मासे वाढा असा हट्ट धरू लागला. मासे तिघांना पुरेल इतकेच असल्याचं म्हणताच पांडुरंग यांनी मारोती होनाजी नरोटे, त्यांचा मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांच्याशी वाद घालत तिघांना लोखंडी फुंकणी व लाकडाने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. मारोती होनाजी नरोटे यांना जबर मर लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

हे देखील पहा-

घटनेची माहिती मिळताच सुशिलाबाई मारुती नरोटे या मयत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पांडुरंग ज्ञानदेव हांगे यांच्या विरुद्ध गुन्हाचा गुन्हा दाखल करत जखमी राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर आरोपीला अटक करत या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी अधिक तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने कोल्हापूरमध्ये युवाशक्ती दहीहंडी

Maharashtra Politics : मोठा राजकीय घडामोड! भाजपला शिंदे गट जोरदार धक्का देणार?

Central Government: ऐन सणाच्यावेळी केंद्र सरकारनं दिली 'गुड न्यूज', पगार अन् पेन्शनबाबत घेतला मोठा निर्णय

Lalbaugcha Raja 2025 First Look : लालबागच्या राजाची पहिली झलक; भक्तांचा जल्लोष, वातावरण भारावून गेले|VIDEO

Janhvi Kapoor: 'परी म्हणू की सुंदरी...'; फ्लोरल ड्रेसमधील जान्हवीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT