सांगली : तासगाव (tasgoan) तालुक्यातील बलगवडे येथे वायफळे रस्त्यालगत गावातील लोक व्यायामाला जात असताना रस्त्याच्या कडेला बेवारस टाकून दिलेले स्त्री जातीचे चार महिन्यांचे बाळ सापडले. ग्रामस्थांनी तात्काळ हे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) नेऊन प्रथम उपचार करून तासगाव पोलिसांच्या (police) ताब्यात दिले. तासगाव पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी बाळास सांगली (sangli) येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. (sangli latest marathi news)
बाळाच्या तोंडाला छोटीशी जखम झाली होती. बाळाच्या कपड्याला धूळ, कुसळे व काटे लागले होते. बाळ जोर जोरात रडत होते. त्यामुळे ते झुडपात असल्याचे लाेकांना समजले. सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील, राजेंद्र रास्ते, सूरज शिंदे यांनी तातडीने बाळास गावातील उपकेंद्रात नेले. आरोग्य कर्मचारी शुभांगी मोहिते आणि हेमलता जगताप यांनी प्रथमोपचार केले.
माजी पोलीस पाटील रघुनाथ पाटील, सरपंच जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली. तासगाव पोलीस घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळाला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.