Cyber Crime: साताऱ्यात सैनिकाच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये लंपास

बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अज्ञात व्यक्तीचा शोध घेताहेत.
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

सातारा : साताऱ्यात (satara) सुटीसाठी गावी आलेल्या सैनिकाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गायब केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अनोळखी व्यक्तीने बँक (bank) खात्यातील साडेसात लाख रुपये काढल्याप्रकरणी बोरगाव पोलिस (police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (satara latest marathi news)

आसनगाव (ता. सातारा) येथील प्रमोद शंकर पवार हे गेल्या तीन वर्षांपासून भारतीय सैन्य दलात (indian army) कार्यरत आहेत. सध्या ते अरुणाचल प्रदेश (arunachal pradesh) येथे कर्तव्य बजावत आहेत. गावी घर बांधण्यासाठी प्रमोद यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रतापगंज पेठ शाखेतून अकरा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी त्यांच्या खात्यात साडेसात लाख रुपये शिल्लक होते.

Cyber Crime
ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत

गुरुवारी सकाळी ते घरी असताना क्रेडिट कार्डसाठी (credit card) 28 हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला चौकशीसाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरला फोन केला असता त्यांना एक application डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. ते डाऊनलोड केल्यानंतर बँकेचा खाते क्रमांक विचारण्यात आला तो सांगितल्यावर पाच मिनिटातच त्यांच्या मोबाईलवर पैसे कट झाल्याचे मेसेज पडू लागले. अनोळखी व्यक्तीने त्यांच्या खात्यातून काही मिनिटातच टप्प्याटप्प्याने साडेसात लाख रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा सायबर सेलकडे (Satara Cyber ​​Cell) तक्रार केली.

Cyber Crime
महानिर्मितीचे कर्मचारी संपावर; काेयनेची वीज निर्मिती ठप्प; पाण्याचाही नदीत विसर्ग

पोलिसांनी याबाबत तपास केला असता ही सर्व रक्कम कर्नाटका बँकेच्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले. कर्नाटका बँकेशी संपर्क साधला असता त्यावेळी खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे वर्ग झाल्याचे समजले. बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com