Jalgaon Mother Milk Bank  Saam Tv
महाराष्ट्र

Mother Milk Bank: आईच्या दुधाची पहिली मिल्क बँक जळगावात सुरू, प्रत्येक बाळाला मिळणार दूध

Jalgaon Mother Milk Bank : तुम्ही आजवर मनी बँक ऐकली असेल, ब्लड बँकही पहिली असेल. स्पर्म बँक ही सुरु झाल्यात, पण आता जळगावात पहिली मदर मिल्क बँक सुरु करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jalgaon Mother Milk Bank :

>> प्रसाद जगताप

तुम्ही आजवर मनी बँक ऐकली असेल, ब्लड बँकही पहिली असेल. स्पर्म बँक ही सुरु झाल्यात, पण आता जळगावात पहिली मदर मिल्क बँक सुरु करण्यात आली आहे. आईच्या दूधाविना कुठलंच लेकरू पोरकं राहू नये, म्हणून ही भन्नाट संकल्पना साकरण्यात आली आहे.

बाळ जन्माला आल्यावर त्याच्यासाठी आईचं दूध म्हणजे अमृत असतं. पण हेच अमृत प्रत्येकाच्या वाट्याला येतच असं नाही, जन्माल्या आल्या आल्या काही बाळांना त्यांची आई सोडून जाते, आणि काही बाळांचं पोट भरेन इतकंही दूध त्यांना आईकडून मिळत नाही. अशाच बाळांसाठी ही मदर मिल्क बँक वरदान आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी आईचं दूध पिलं नाहीये, असा वाक्यप्रचार या तंत्रज्ञानामुळे हद्दपार होऊ शकतो, पण आईचं दूध कुणी कसं काय स्टोर करु शकतं? यासाठी कसं तंत्रज्ञान वापरलंय? ते किती दिवस वापरता येऊ शकतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? हेच जाणून घेऊ...  (Latest Marathi News)

आईचं दूध बाळापर्यंत कसं पोहचवता येईल. यासाठी शक्य ती काळजी घेण्यात आली आहे. ही भन्नाट संकल्पना जळगाव जिल्हा रुग्णालयात वापरली गेलीये. जसं कुणीही आपल्या स्व:इच्छेने रक्तदान करु शकतं, तसंच आता प्रत्येक माता आपल्या इच्छेने आपल्या बाळाबरोबर इतर भुकेल्या बाळांचं पोट भरू शकते. त्यामुळे नाशिक विभागली ही पहिली मदर मिल्क बँक आता अनेक नवजात शिशूंसाठी वरदान ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत दोन महिलांचा अपघाती मृत्यू

Pinga Ga Pori Pinga : 'पिंगा गर्ल्स'च्या नात्यात दुरावा? 3 वर्षानंतर होणार नवी सुरुवात, पाहा VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; मॅनेजर पदांसाठी होणार भरती; मिळणार भरघोस पगार

'भारत कधीही तडजोड करणार नाही'; ट्रम्पच्या टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Moong Dal Soup: बाहेरचं खाणं कशाला? घरच्या घरी बनवा चटपटीत आणि गरमागरम मुग डाळीचे सूप, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT