भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, नड्डा यांचा राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला आहे.
गेल्या महिन्यात गुजरातमधून वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ते 57 राज्यसभा सदस्यांपैकी एक होते, ज्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 41 उमेदवारांपैकी नड्डा हे एक आहेत. त्यांना गुजरातमधून पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आलं होतं. (Latest Marathi News)
दरम्यान, जेपी नड्डा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश करून विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे वडील पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू होते. 1977 मध्ये अभाविपच्या तिकिटावर त्यांनी पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून निवडणूक जिंकली. ते एकाच वेळी अभाविपच्या दैनंदिन कामकाजात सहभागी झाले आणि विविध पदे भूषवली. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत वयाच्या 29 व्या वर्षी जेपी नड्डा यांना भाजपच्या युवा शाखेचे निवडणूक प्रभारी म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 1991 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गृहराज्य हिमाचल प्रदेशमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि तीनदा विजय मिळवला. 1993 ते 1998, 1998 ते 2003 आणि 2007 ते 2012 असे तीन वेळा ते हिमाचल प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी वन, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह अनेक मंत्रालये भूषवली.
जेपी नड्डा 2012 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. ते वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती या समित्यांचे सदस्य होते. 2014 मध्ये ते आरोग्य मंत्री झाले आणि 2019 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. जून 2019 मध्ये त्यांची भाजपचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.