Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ! FEMA प्रकरणी पुन्हा ईडीने पाठवलं समन्स

ED Summons To Mahua Moitra: ईडीने टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना पुन्हा समन्स पाठवले आहे. महुआ यांना फेमा प्रकरणात हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.
Mahua Moitra
Mahua Moitra Saam Digital
Published On

ED Summons To Mahua Moitra: 

ईडीने टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना पुन्हा समन्स पाठवले आहे. महुआ यांना फेमा प्रकरणात हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने महुआ यांना 11 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

महुआ मोईत्रा यांना 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील ईडी कार्यालयात फेमा प्रकरणी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्या उपस्थित राहू शकल्या नाही. यानंतर त्यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahua Moitra
Lok sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या ४० जागांचं वाटप ठरलं, बड्या नेत्यानं कन्फर्म सांगितलं!

या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोईत्रा यांच्याविरुद्ध फेमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण त्यांच्याकडे काही विदेशी व्यवहारांची माहिती आहे. ज्यात अज्ञात व्यवहारांचा समावेश आहे. ज्याची कायद्यान्वये चौकशी करण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

लोकसभेचे सदस्यत्व रद्द

दरम्यान, कथित 'कॅश फॉर क्वेरी' संदर्भात प्राथमिक तपासाचा एक भाग म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडून मोईत्रा यांची आधीच चौकशी केली जात आहे. 'कॅश-फॉर-क्वेरी' प्रकरणात नीतिशास्त्र समितीने दोषी ठरवल्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.

Mahua Moitra
Electoral Bonds: SBI ने निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंत मागितली वेळ, सुप्रीम कोर्टाने दिली नवीन डेडलाईन

मिळालेल्या माहितीनुसार, भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. आर्थिक फायद्यासाठी मोईत्रा यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर त्यांची नीतिशास्त्र समितीने चौकशी केली आणि त्यांची खासदारकी रद्द केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com