fire broke in shops at buldhana and solapur saam tv
महाराष्ट्र

साेलापूरमधील नई जिंदगी परिसरात आगीची घटना, 3 शेळ्यांचा मृत्यू; बुलढाणामध्ये भंगार साहित्याचे दुकान पेटले

ही आग लागताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीने राैद्ररुप धारण केल्याने आग विझविण्यासाठीचे नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले.

Siddharth Latkar

विश्वभूषण लिमये / संजय जाधव

Fire News :

साेलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यात आज (शनिवार) फर्नीचर आणि भंगार साहित्याच्या दुकानाला आग लागली. या आगीत दाेन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेत हजाराे रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान साेलापूरातील आगीच्या घटनेत तीन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (Maharashtra News)

सोलापुर शहरातील नई जिंदगी परिसरात आज (शुनिवार) एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली. या आगीचे कारण अद्याप समाेर आलेले नाही. या दुकानाला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूला असलेल्या 4 घरांना त्याची झळ बसली.

या आगीमुळे फर्निचर दुकानातील साहित्य आणि घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत आगीत फर्निचर दुकानात असणा-या 3 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील विकमशी चौकातील भांगरच्या दुकानाला आज (शनिवार) सकाळी मोठी आग लागली. या आगीमध्ये दुकानातील पुष्टे,वायर,प्लास्टिक व इतर साहित्य जाळून खाक झाले. या दुकानानजीक असलेल्या डिपी जवळ शॉटसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही आग लागताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीने राैद्ररुप धारण केल्याने आग विझविण्यासाठीचे नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले. नागरिकांनी खामगाव नगरपरिषद अग्निशामन दलास पाचारण केले.

खामगाव नगरपरिषदेचे अग्निशामक दलाचे कर्मचा-यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान अग्निशामक दलाच्या वाहनातील पाण्याचा पाईप ठिक- ठिकाणी फुटला हाेता. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावरच वाया गेले. अखेरीस शेगाव येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT