राजापूरात वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करत व्हेल माशाची उलटी (whale fish vomit) प्रकरणी तसेच तस्करी करणा-या तिघांना पकडले. या तिघांवर राजापूर पाेलिस ठाण्यात (rajapur police station) गुन्हा नाेंदविण्यात आला. न्यायालयाने तिन्ही संशयितांना 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावल्याची माहिती वन विभागातील अधिकारी यांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)
वनविभागास काही जण व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानंतर वनविभागाने राजापूर तालुक्यातील ताम्हाणे-पाचल रस्त्यावर सापळा रचला. या सापळ्यात संशयित अलगद सापडले.
वन विभाग आणि पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार राजकुमार सुरेश शेलार (नांदीवली, कल्याण पूर्व), आकाश राजेद्र घाडगे (सानपाडा), रुपेश गणपत (आवरे, रायगड) आणि जगदीश पाेतदार (पाचल, राजापूर, रत्नागिरी) यांना व्हेल माशाच्या उलटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चाैघांना १६ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.