Satara Phaltan Female Doctor News : साताऱ्यातील फलटणमध्ये सरकारी रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टराने आयुष्याचा दोर कापला अन् राज्याची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली. पोलिस उपनिरीक्षक व घरमालकाच्या मुलाने बलात्कार केला अन् मानसिक छळ केल्याचा आरोप करत डॉक्टर महिलेने आयुष्याचा शेवट केला. या घटनेत खासदाराचे नावही समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. महिला डॉक्टराच्या कुटुंबियांकडूनही गंभीर आरोप करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.
दिवाळीच्या सणाला ती घरी येणार होती, पण कुटुंबियाकडे तिच्या निधनाची बातमी पोहचली अन् घरावर दुखाचा डोंगर कोसळला. आई-बाप अन् भाऊ यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबतच नव्हत्या. मुलीचा मृतदेह पाहून आईच्या अश्रूंचा बांध फुटला. मुलीच्या मृतदेहाला कवेत घेऊन ती धो धो रडली. बीडमध्ये रात्री उशिरा त्या महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिला डॉक्टरच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थित प्रत्येकाचे काळीज थरथरले.
साताऱ्यात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. आठ तासानंतर बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई-वडील भाऊ यांच्यासह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. मुलीवर अंत्यसंस्कार होत असताना आईचा आक्रोश पाहून प्रत्येकाचे काळीज चिरल्याची माहिती उपस्थितांनी दिली. शेतीत काबाडकष्ट करून मुलीला डॉक्टर केले. सरकारी रूग्णालयात नोकरी मिळाली. पण नियतीने होत्याचं नव्हते केले. खाकीने त्यांच्या कुटुंबाचा तुकडा हिरावला अन् महाराष्ट्र हादरला.
फलटण येथील सरकारी रूग्णालयात बीडमधील छोट्या गावातून आलेली महिला डॉक्टर कार्यरत होती. पोलिसांनी तिच्याकडून चुकीच्या रिपोर्टसाठी दबाव टाकला. त्या कृत्याला तिने विरोध केला. पण त्यामुळेच क्षणात होत्याचं नव्हतं झालं. महिला डॉक्टरला पोलीस अन् घरमालकाच्या मुलाने मानसिक छळ तर केलाच.पण अब्रुही लुटली. रक्षकच भक्षक झाल्याने राज्यात संतापाची लाट आहे. पोलिस उपनिरीक्षक व घरमालकाच्या मुलाने शारीरिक व मानसिक छळ करून बलात्कार केल्याची हातावर लिहिले अन् आयुष्याचा दोर कापला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसावर फटलण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ते फरार असून त्यांचा शोध घेतला जातोय. या प्रकरणात एका राजकीय नेत्याचे कनेक्शनही समोर आल्याने याला आता राजकीय वळण आलेय. हा राजकीय नेता सत्ताधारी पक्षाचा असल्याचा आरोप केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.