Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: टोमॅटोवर CCTVची नजर; चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे शेतकऱ्यानं लढवली भन्नाट शक्कल

Tomato Price Hike: टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून पठ्ठ्यानं लढवली शक्कल; शेतात लावला सीसीटीव्ही कॅमेरा

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

Nashik News: राज्यात टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. टोमॅटोचे दर वाढत असल्याने सध्या टोमॅटोला सोन्याचा भाव आलाय. एवढे टोमॅटोंची चोरी होत असल्याच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. महाग टोमॅटो आपल्या शेतातूनच चोरी होऊ लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (Latest Marathi News)

अशात नाशिकमध्ये एका शेतकऱ्याने आपले महागडे टोमॅटो कोणीही चोरुनयेत यासाठी मोठी शक्कल लढवली आहे. त्याने थेट आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सध्या टोमॅटोसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या निफाड तालूक्यातील कोकणगाव येथिल शेतकरी अब्दुलगनी सैय्यद यांनी आपल्या तीन एकरात टोमॅटोची लागवड केली आहे. संपूर्ण टोमॅटो क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी तीन बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शेतापासून घर लांब असल्याने पिकाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांची नजर आता टोमॅटोवर राहणार आहे.

टोमॅटोचे भाव वाढल्याने नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. एकीकडे टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत तर दुसरीकडे कोथिंबीर, मेथी आणि शेपू रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे.

बाजारात एकीकडे शेतकऱ्यांना २ रुपये प्रति जुडी इतका कवडीमोल भाव, तर बाजूला किरकोळ बाजारात ग्राहकांना तीच जुडी १० रुपयांना विकली जातेय. महिनाभरापूर्वी तेजीत असलेली कोथिंबीर, मेथी आणि शेपू आता रस्त्यावर फेकण्याची वेळ नाशिकच्या शेतकऱ्यांवर आली आहे.

नाशिकच्या बाजार समितीत लिलावाच्या दरम्यान कवडीमोल भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोथंबीर, मेथी आणि शेपू बाजार समितीच्या आवारातच फेकून देत संताप व्यक्त केलाय. एकीकडे शेतकऱ्यांना लिलावात २ रुपये इतका कवडीमोल भाव मिळतोय, तशीच परिस्थिती मेथी आणि शेपूच्या जुडीची देखील आहे. तर दुसरीकडे किरकोळ बाजारात तीच कोथिंबिरीची, मेथीची जुडी ग्राहकांना १० रुपयांना विकत घ्यावी लागतेय.

विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला 150 ते 200 रुपये मोजावे लागत होते. मात्र बाजारात आवक वाढल्यानं त्याचा परिमाण भावात झालाय. परिणामी महिनाभरातच बदललेल्या परिस्थितीने बळीराजा पुरता हवालदिल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Bollywood Celebrities Restaurants : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या 'या' रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही कधी गेलाय का?

शिवसेना - मनसेची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन | Maharashtra Politics

Sonalee Kulkarni Full Name: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं पूर्ण नाव काय आहे? अनेकांना माहित नाही

Ajinkyatara Fort : 'अजिंक्यतारा किल्ला' साताऱ्यातील ऐतिहासिक ठिकाण, लहान मुलांसोबत एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT