Mumbai Crime News: गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये करायचे मोबाईल चोरी; विल्हेवाट लावण्यासाठी दुकानही थाटलं, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील अथर्व कॉलेज परिसरात बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना समोर आली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv
Published On

संजय गडदे

Mumbai Crime news: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील अथर्व कॉलेज परिसरात बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन सराईत मोबाईल चोरट्यांना कांदिवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. चोरीच्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी या चोरट्यांनी थेट मुंबईच्या मालवणी परिसरात मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान देखील थाटल्याचेही समोर आले आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी सलीम रईस शेख (24 वर्ष ),अल्ताफ तुरब अली रूपाणी (44 वर्ष) हे दोन मोबाईल चोर आणि शहाद इसाफ खान (43 वर्ष), रमजान बाबामिया लांजेकर (51 वर्ष) आणि हमीद अहमद खान (42 वर्ष) चोरीचे मोबाईल विकत घेणारे असे मिळून एकूण पाच जणांना अटक केली आहे.

Mumbai Crime News
Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! न्यायालयीन परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार; नागरिकांत घबराटीचे वातावरण

यांच्याकडून कांदिवली पोलिसांनी एकूण 74 मोबाईल हस्तगत केले असून ज्याची अंदाजे किंमत सात लाख 35 हजार इतकी आहे. पाचही आरोपी सध्या कांदिवली पोलिसांच्या ताब्यात असून अधिकचा तपास करत आहेत.

चोरट्यांनी ७० हून अधिक मोबाईल चोरले

कांदिवली, बोरिवली, मालाड, मालवणी परीसरात मागील २ ते ३ महिन्यात बस मध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. बेस्ट बस क्रमांक २७७ मधून मालवणी फायर ब्रिगेड बस स्टॉप ते कांदिवली स्टेशन देना बँक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरी झाल्यानंतर कांदिवली पोलीस ठाणे येथे कलम ३७९,४११,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

यानंतर वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी हेमंत गिते, इंद्रजीत भिसे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी बेस्ट बस क्रमांक २७७, २४४ व २०७ बस रूटवर साध्या वेशात पाळत ठेवून बेस्ट बस क्रमांक 277 मधून दोन मोबाईल चोरांना प्रवाशाचा मोबाईल चोरी करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मागील २ ते ३ महिन्यांमध्ये चोरी गेलेले ७४ मोबाईल त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आले. हे ७४ मोबाईल अंदाजे किंमत रु ७,३५,६००/- रुपये किमतीचे आहेत.

Mumbai Crime News
Mumbai Crime News: धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं; दादर रेल्वे स्टेशनमधील घटना

आरोपी हे कांदिवली पश्चिमेकडील बेस्ट बस 277,गर्दीच्या ठिकाणी बस स्टॉप वर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना धक्का द्यायचे. त्यानंतर प्रवाशांचे मोबाईल चोरी करून एकमेकांना मोबाईल लंपास करून चोरी करून पसार होत असे

चोरीच्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी थाटले थेट दुकान

मुंबईचा कांदिवली परिसरात गर्दीच्या वेळेत सकाळी आणि संध्याकाळी बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चोरांनी एक भन्नाट योजना आखली या योजनेनुसार सलीम रईस शेख (24 वर्ष ),अल्ताफ तुरब अली रूपाणी (44 वर्ष) हे दोघे गर्दीच्या वेळी प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरायचे.

शहाद इसाफ खान (43 वर्ष), रमजान बाबामिया लांजेकर (51 वर्ष) आणि हमीद अहमद खान (42 वर्ष) हे तिघेजण चोरीचे मोबाईल विकत घेऊन त्यांनी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात मोबाईल दुरुस्ती आणि विक्रीचे दुकान थाटल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले.

Mumbai Crime News
Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! न्यायालयीन परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार; नागरिकांत घबराटीचे वातावरण

मुंबईच्या कांदिवली, मालवणी मालाड या परिसरात मागील दोन ते तीन महिन्यात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत ज्या नागरिकांचे मोबाईल चोरी झाले आहेत आणि ते पुन्हा मिळाले नाहीत सर्व फिर्यादारांनी कांदिवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपापले मोबाईल ओळखून घेऊन जावेत असे आवाहन झोन अकराचे डीसीपी अजय कुमार बंसल यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com