Onion Export: कांदा उत्पादक शेतकरी संकटात, बांग्लादेशने कांदा आयातीवर लावले निर्बंध| VIDEO

Bangladesh Restricts Onion Export: कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता बांग्लादेशने कांदा आयतीवर निर्बंध लावले आहेत. नवीन परवाने दिले जात नाहीयेत. त्यामुळे जुन्या परवान्यांच्या साहाय्याने फक्त ३० जानेवारीपर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. भारतातील सर्वाधिक कांदा हा बांग्लादेशमध्ये पाठवला जातो. आता बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता नवीन परवाने देणे बंद करण्यात आले आहेत. जुन्या आयात परवान्यांचा कालावधी फक्त ३० जानेवारीपर्यंतच राहणार आहे.यानंतर जुन्या परवान्यांचा वापर मान्य केला जाणार नाही. त्यामुळे तोपर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे. ही घोषणा शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांसाठी चिंतेंची ठरली आहे. याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावांवर आणि पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. फक्त नाशिक जिल्ह्यातून दररोज दीड हजार टन कांदा बांग्लादेशला पाठवला जातो. परंतु आता या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना फटका बसणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com