Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; मुंबईत प्रसिद्ध क्रिकेट क्लबवर FDA ची कारवाई, किचनमध्ये झुरळं आढळल्याचे उघड chatgpt
महाराष्ट्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; मुंबईत प्रसिद्ध क्रिकेट क्लबवर FDA ची कारवाई, किचनमध्ये झुरळं आढळल्याचे उघड

FDA Action : तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई सुरूच आहे. मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट क्लबसह इतर आस्थापनांवर धडक कारवाई केली. तर काहींचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला.

Saam Tv

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं भेसळखोर, टपऱ्या, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यामुळं भेसळखोर आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक दुकानं, आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात येत असून, काही आस्थापनांना थेट टाळे ठोकले आहे. राज्यभरातील कारवाईनंतर एफडीएचा मोर्चा थेट मुंबईत वळला आहे. अन्न व औषध प्रशासनानं मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट क्लबमधील कॅटरिंग सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांसह अन्य आस्थापनांवर कारवाई केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील क्रिकेट क्लब, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट्सवरील विशेष तपासणी मोहिमेत नामांकित The Cricket Club of India (CCI) आणि MIG Cricket Club, वांद्रे (पूर्व) यांच्यासह पाच आस्थापनांवर कारवाई केली. या तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याने CCI चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

MIG क्रिकेट क्लबमध्ये परवान्याविना कॅटरिंग सेवा, स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, अयोग्य अन्न साठवणूक, शिजवलेले व कच्चे अन्न एकत्र ठेवणे आणि अन्न-पाण्याच्या चाचण्या नियमित न केल्याचे आढळले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय आरके जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना आणि द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्येही विविध त्रुटी आढळल्या. तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लब (मालाड पश्चिम) ला व्यवसाय बंद नोटीस बजावण्यात आली. FDA ने सर्व आस्थापनांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT