भ्रष्टाचारासाठी एसटीच्या पदोन्नती प्रक्रिया 3 वर्ष रखडवली; श्रीरंग बरगे यांचा आरोप

MSRTC Employee Promotion: महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी राज्य परिवहन महामंडळातील लिपिक-टंकलेखक पदांच्या पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय.
MSRTC  Employee Promotion
Maharashtra ST Employees Congress leader Shrirang Barge addressing concerns over alleged irregularities and delays in the ST Corporation's promotion process.saam tv
Published On
Summary
  • एसटी महामंडळातील पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता

  • भ्रष्टाचारासाठी पदोन्नती प्रक्रिया तीन वर्षे रखडवण्यात आल्याचा गंभीर आरोप

  • लिपिक-टंकलेखक पदांच्या पदोन्नती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील लिपिक-टंकलेखक पदांच्या खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केलाय. संबंधित अधिकाऱ्यांची नव्याने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.भ्रष्टाचारा साठी प्रमोशनची प्रक्रिया रखडवली असा आरोपही त्यांनी केलाय.

MSRTC  Employee Promotion
MSRTC अखेर दरवाढ केलीच! मध्यरात्रीपासून नवे दर लागू; किती असेल मुंबई-पुण्यासाठी तिकीट

चालक, वाहक, शिपाई, सहायक आदी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या लिपिक-टंकलेखक पदांच्या २५ टक्के खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत काही विभागांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. भ्रष्टाचाराच्या उद्देशाने ही प्रक्रिया तीन ते चार वर्षे रखडवाण्यात आली. तर काही ठिकाणी ज्येष्ठता डावलून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. तर काही प्रकरणात नावातील बदलाचे कारण देत नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याच निदर्शनात आले.

MSRTC  Employee Promotion
ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

सरळ सेवा भरतीतील रिक्त होणाऱ्या पदांपैकी २५ टक्के पदे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून दरवर्षी भरली जाणे आवश्यक असल्याच परिपत्रक आहे. पण गेली दोन ते तीन वर्षे ही प्रक्रिया रखडल्याने अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत असा आरोप बरगे यांनी केला आहे. एका विभागातील खात्यांतर्गत चौकशीत समितीतील तीन अधिकाऱ्यांवर समान स्वरूपाचे आरोप केले होते. मात्र, त्यापैकी दोघांना दोषी ठरविण्यात आले, तर एका अधिकाऱ्याला निर्दोष सोडल्याचा आरोपही बरगे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com