farmers opposes sillod midc saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसी बारगळण्याची शक्यता, शेतकऱ्यांचा जमीन देण्यास नकार

या एमआयडीसीला आता विराेध वाढू लागला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे प्रस्तावित नवीन एमआयडीसीसाठी (sillod midc) जमीन देण्यास शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे ही एमआयडीसी बारगळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra News)

तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी सिल्लोड येथे मोठा गाजावाजा करीत कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या एमआयडीसीची घोषणा केली होती. परंतु या एमआयडीसीला आता विराेध वाढू लागला आहे.

सिल्लोड तालुक्यासह जवळच्या भागात कापूस, अद्रक, मिरची आणि मक्याचे उत्पादन होते. या शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग यावेत, यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वर्षभरापूर्वी सिल्लोडसाठी स्वतंत्र एमआयडीसी मंजूर करून घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या एमआयडीसीसाठी सिल्लोड तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील एकूण ७०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनानेही या भूसंपादनास मंजुरी दिली होती.

एमआयडीसी बारगळण्याच्या शक्यतेची चर्चा

आपली चांगली जमीन एमआयडीसीसाठी घेतली जाणार असल्याचे शेतकऱ्यांना समजताच त्यांनी त्यांच्या मालकीची जमीन देण्यास विरोध दर्शविला. जमीन भूसंपादनाच अधिसूचना अद्याप जारी करण्यात आली नाही. शेतकऱ्यांकडून असाच विरोध राहिल्यास प्रस्तावित एमआयडीसी बारगळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणा; यंदाच्या दिवाळीपासून 'या' महिलांनाही मिळणार १५०० रूपये

Ragi Or Oats: नाचणी की ओट्स वजन कमी करण्यासाठी काय ठरेल बेस्ट

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT