farmers andolan for regular power supply in buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : मेहेकर तालुक्यातील शेतकरी संतप्त, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पॉवर हाऊस कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदाेलन

विद्युत पुरवठ्यासाठी डोनगाव विभागातील शेतकरी एकटवले.

संजय जाधव

Buldhana News :

पीक सुकत आहेत लाईन द्या! अशी मागणी मेहेकर तालुक्यातील जानुना, राजगड, विठ्ठलवाडी, बेलगांव, पागरखेड या गावातील शेकडो शेतक-यांनी पॉवर हाऊस येथील कार्यालय अधिकारी कार्यालयास केले. असंख्य शेतकऱ्यांनी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील सुरु केले आहे. (Maharashtra News)

डोणगाव विद्युत वितरण विभागाच्या भाग एक मधील जनूना, राजगड, विठ्ठलवाडी, बेलगाव, पागरखेड शेतकऱ्यांच्या सोबतच गावातील जनता विद्युत वितरण विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतातील रब्बी पिके सुकायला लागली आहेत. विहिरीत थोडेफार पाणी आहे मात्र पाणी देण्यासाठी विज नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी पॉवर हाऊसवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत डोनगाव विभागातील सर्व गावातील विज सुरु करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT