Diwali 2023 : दिवाळीत तरी फुलांना भाव मिळेल का? चिंतातूर शेतक-यांची कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी झेंडूची माेठ्या प्रमाणात लागवड केली.
artifical flowers
artifical flowerssaam tv

- सुशील थोरात

Nagar News :

दसरा आणि दिवाळीला झेंडूच्या फुलांना महत्व असते. यामुळे शेतकरी झेंडूची लागवड करुन चार पैसे मिळण्याची अपेक्षा ठेवत असतात. परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावरच फेकून दिले. कृत्रिम फुले स्वस्त दरात मिळू लागल्याने नैसर्गिक फुलांना कमी मागणी अशी नेहमी चर्चा हाेत असते. त्यातूनच आता कृत्रिम फुलांवर बंदी आणा अशी मागणी शेतक-यांत हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

artifical flowers
RTO ने घेतली नाेंद; खासगी बस व्यावसायिकांकडून प्रवाशांची लूट, तिकीटासाठी 900 ऐवजी 3100 रुपये घेतले

दसरा आणि दिवाळीत झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. या दोन्ही सणांना घराघरात झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करतात. त्यामाध्यमातून सणासाठी शेतकऱ्यांच्या घरात चार पैसे येतात. परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना भाव न मिळाल्याने शेतकरी वर्ग संकटात आला होता.

आता दिवाळीच्या सणाला सुद्धा बाजारामध्ये फुलांना भाव कमी प्रमाणात असून जवळपास 30 ते 40 रुपये किलो बाजारभाव असून आवक कमी असल्यामुळे या दिवाळीला तरी झेंडूला आणि इतर फुलांना भाव मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी केली आहे.

सध्या बाजारांमध्ये कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे झेंडू आणि इतर फुलांची मागणी कमी झाली आहे. वर्षभर टिकणारे प्लास्टिकचे आणि कापडाचे कृत्रिम फुले वापरण्यावर नागरिक जास्त भर देत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये पिकलेल्या फुलांना भाव कमी मिळत असून प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दसऱ्याला फुलांना भाव मिळाला नाही मात्र आता दिवाळीत तरी भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.

artifical flowers
Rs 10, 000 Coin : दहा हजार रुपयांचे नाणे पाहण्यासाठी नगरवासियांची उडाली झुंबड

अहमदनगर (nagar) शहरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू ,शेवंती, गुलाब, मोगरा, गुलछडी अशी फुले विक्रीसाठी आली आहेत. नगर मधील मार्केट यार्ड फुल बाजारात झेंडूची फुले खरेदीसाठी मोठी गर्दी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक बाजारात होत असते निदान दिवाळीला चांगला भाव मिळाला तर ही दिवाळी आनंदाची आणि गोड जाईल अशी अपेक्षा फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आहे.

Edited By : Siddharth Latkar

artifical flowers
Shashikant Shinde On Onion Policy : एपीएमसीत अफगाणिस्तानचा कांदा येताच शशिकांत शिंदेंनी केंद्राला सुनावले, खाणा-यांचा विचार...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com