RTO ने घेतली नाेंद; खासगी बस व्यावसायिकांकडून प्रवाशांची लूट, तिकीटासाठी 900 ऐवजी 3100 रुपये घेतले

नागरिकांनी dyrto.28-mh@gov.in ई-मेलवर तक्रार नोंदवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
buldhana rto warns tourist bus operators on charging higher fare
buldhana rto warns tourist bus operators on charging higher faresaam tv
Published On

Buldhana News :

खासगी बससाठी कमाल भाडेदर शासन निर्णयाद्वारे निश्चित करून देण्यात आले आहेत. त्याहून अधिक दर आकारल्याचे आढळल्यास नागरिकांनी ऑनलाईन तक्रार द्यावी. त्यानंतर संबंधितांची चाैकशी करुन त्यांच्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

buldhana rto warns tourist bus operators on charging higher fare
Uddhav Thackeray Faction : अकाेल्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची पीक विमा कंपनी कार्यालयात ताेडफाेड

सद्या दिवाळीची धूम असून मुंबई पुणे वरून गावी येण्यासाठी खाजगी ट्रायव्हल्स बसचे भाडे वाढविण्यात आले आहे. मागील महिन्यात हे प्रवास भाडे 900 रुपये होते आज चक्क 3100 रुपये घेण्यात येत असल्याने प्रवाशांची प्रचंड मनमानी लुट केली जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (rto) ऑनलाईन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत (27 एप्रिल 2018) शासन निर्णयाद्वारे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (mrstc bus) त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडे दर विचारात घेण्यात आले आणि खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर निश्चित करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे खासगी ट्रॅव्हलकडून कमाल भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यासंदर्भात dyrto.28-mh@gov.in ई-मेलवर तक्रार नोंदवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

buldhana rto warns tourist bus operators on charging higher fare
Shashikant Shinde On Onion Policy : एपीएमसीत अफगाणिस्तानचा कांदा येताच शशिकांत शिंदेंनी केंद्राला सुनावले, खाणा-यांचा विचार...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com