- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अफगाणिस्तानचा 30 टन कांदा (afghanistan onion in navi mumbai apmc market) दाखल झाला आहे. अफगाणिस्तानातून कांदा आल्याने माथाडी कामगार नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra News)
एकीकडे देशांतर्गत कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा कांदा परदेशात पाठविण्यावर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लावले तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून कांदा आयात झाल्याने केंद्र सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भारतीय कांद्याला किलोमागे 40 ते 45 रुपये असा चांगला बाजारभाव मिळत असून अफगाणिस्तानचा कांदा तुलनेने स्वस्त आहे. अफगाणिस्तानचा कांदा 30 ते 35 रुपये प्रति किलोने उपलब्ध असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या आयाती मागे ऐन दिवाळीत केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा डाव आहे का असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले आपण खाणा-यांचा विचार करत आहात मग पिकविणा-यांचा देखील करणे आवश्यक आहे. परराष्ट्रातून येणारा कांदा हा अतिआवश्यक असेल तर सरकार घेत असलेला निर्णय चुकीचा आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कांद्याचा आत्ताचा दर आणि पूर्वीचा दर यामध्ये स्थिरता का नाही याचा सरकाराने विचार करावा असेही आमदार शिंदे यांनी म्हटले हाेते. धाेरणात्मक निर्णय घेताना शेतक-यांचा हिताचा विचार करावा असेही आमदार शिंदेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.