Vasubaras दिनी पाेलीसांनी वाचविले चार गायींचे प्राण, गाे तस्करांना अटक

पाेलीसांच्या धाडसाचे नागरिकांकडून काैतुक हाेऊ लागले आहे.
palghar police arrests two youth on vasubaras din
palghar police arrests two youth on vasubaras dinsaam tv
Published On

Palghar Crime News :

पालघर जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास गुरे चोरणाऱ्या गोतस्करांकडून पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेने (palghar local crime branch) माेठ्या शिताफिने दाेघांना अटक केली. (Maharashtra News)

palghar police arrests two youth on vasubaras din
Shashikant Shinde On Onion Policy : एपीएमसीत अफगाणिस्तानचा कांदा येताच शशिकांत शिंदेंनी केंद्राला सुनावले, खाणा-यांचा विचार...

मनोर पोलीस ठाण्यातील चहाडे नाका येथे तपासणीसाठी तसेच गस्तीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कार्यरत हाेते. यावेळी चहाडे नाका येथे गस्त घालणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पोलिसांच्या अंगावर एकाने चार चाकी घातली. त्यानंतर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांच्या कारचा बॅरेकेटला धडकून अपघात झाला.

यावेळी पाेलीस कारच्या जवळ जाताच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. पाेलीसांनी माेठ्या शिताफीने कारमधील काहींना पकडले. त्यावेळी पालघर स्थानीक गुन्हे शाखेस कारमध्ये गाई दिसल्या. पाेलिसांनी चार गाईंचे सुखरूप सुटका (palghar lcb saved life of four cows on vasubaras 2023) केली. तसेच दाेघांंना अटक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनंतर पळून गेलेल्या युवकांचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून सुरू आहे अशी माहिती दत्तात्रेय किंद्रे (पोलीस निरीक्षक) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. दरम्यान वसूबारस (vasubaras 2023) दिवशीच गायींचे प्राण वाचविल्याने पाेलीसांचे नागरिकांकडून काैतुक हाेऊ लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

palghar police arrests two youth on vasubaras din
Maharashtra : ओ साहेब पोतं उचलायला हात लावता का? जिल्हाधिका-यांचा फाेटाे Social Media त Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com