Aurangabad Crime: अपरात्री चिमुकलीचे अपहरण करून शेतात लपला; नराधमाला पकडण्यासाठी शेतकऱ्याने पेटवला ऊस Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime: अपरात्री चिमुकलीचे अपहरण करून शेतात लपला; नराधमाला पकडण्यासाठी शेतकऱ्याने पेटवला ऊस

औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात वाळूज (Waluj) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास याठिकाणी एका नराधमाने ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण (kidnapping case) केले होते. पीडित मुलीचे अपहरण करून आरोपी उसाच्या शेतात शिरला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे आरोपीला पकडणे कठीण जात होते. (farmer torch acre sugarcane field catch kidnapper crime in aurangabad)

मात्र, प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने थेट उसालाच आग (farmer) लावली आहे. यामुळे नराधम आरोपी उसातून बाहेर आला. तो बाहेर येताच उसतोड कामगारांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विष्णू उत्तम गायकवाड असे अटक केलेल्या ३२ वर्षीय नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नराधम हा डोक्यानी वेडसर असल्याची माहिती दिली आहे. तो जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील रहिवासी आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांची ३ कुटुंबे बैलगाडीने (Bullock cart) मुक्तेश्वर साखर कारखाना येथून वाळूज पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत शिवपूर याठिकाणी आली होती. संबंधित ऊस तोडणी कामगार पहाटे ३ वाजेच्या सुमारास बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहोचले होते. यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या ६ आणि १० वर्षांच्या २ मुलींना बैलगाडीत झोपवून उसतोडणीच्या कामाला लागले होते.

दरम्यान साडे तीनच्या वाजेच्या सुमारास त्यांना आपल्या मुलींच्या ओरडण्याचा आवाज आला. यामुळे पीडितेच्या वडिलांनी बैलगाडीच्या दिशेने धाव घेतली. एका अज्ञात व्यक्तीने लहान बहिणीला उचलून उसाच्या (Sugarcane) शेतात गेल्याची धक्कादायक माहिती मोठ्या मुलीने दिली. यामुळे कामगारांनी एकत्र येत नराधमाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण रात्रीची वेळ असल्याने आरोपीला (accused) पकडणे कठीण झाले आहे.

यावेळी प्रसंगावधान दाखवत शेतकरी बाबासाहेब दुबिले यांनी १ एकर ऊस पेटवून दिला आहे. उसाला आग लागल्यानंतर नराधम आरोपी उसातून बाहेर आला. यावेळी कामगारांनी आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. आरोपीने चिमुकलीचे नेमक कोणत्या कारणासाठी अपहरण केले होते. याची कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT