Farmer Ends Life Saam Tv News
महाराष्ट्र

बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतात शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं; किटकनाशक पिऊन मृत्यूला कवटाळलं

Farmer Ends Life: अडेगाव गावातील शेतकरी गणपत नागापुरे यांनी आत्महत्या केली. अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या तीन एकर शेतीतील कापूस व धान पाण्याखाली गेले. सततच्या नुकसानीमुळे त्यांनी शेतात कीटकनाशक प्राशन करून आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

  • अडेगाव गावातील शेतकरी गणपत नागापुरे यांनी आत्महत्या केली.

  • अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या तीन एकर शेतीतील कापूस व धान पाण्याखाली गेले.

  • सततच्या नुकसानीमुळे त्यांनी शेतात कीटकनाशक प्राशन करून आयुष्य संपवलं.

  • पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनंतर कुटुंब व गावावर शोककळा पसरली.

शेतीचे झालेल्या नुकसानामुळे एका शेतकऱ्यानं किटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावात घडली. मृत शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन होती. मात्र, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. याच कारणामुळे त्यांनी आयुष्य संपवलं.

गणपत भाऊजी नागापुरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील रहिवासी होते. नागापुरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत असे. यावर्षी त्यांनी तीन एकरमध्ये कापूस, धान पेरले होते.

मात्र, संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला. पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली गेली. अद्यापही त्यांची शेती पाण्याखालीच आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतीचे डोळ्यादेखत नुकसान होताना बघणे त्यांना असह्य झाले. घटनेच्या दिवशी त्यांनी शेत गाठले. तसेच शेतातील कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवले.

शेतकरी आणि बैलांचा सण मानल्या जाणाऱ्या बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं. संसार अर्ध्यावर सोडून त्यांनी मृत्यूला कवटाळलं. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. नागापुरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तसेच गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या ५ ठिकाणी थांबलात तर आयुष्य थांबेल; चाणक्यांनी सांगितलेले मार्ग डोक्यात फिट्ट करून घ्या!

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

SCROLL FOR NEXT