Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

खासगी शाळेकडून पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक, मुलांची फी परत न मिळाल्याने डोळ्यात अश्रू

Hingoli school fraud : हिंगोलीतील खोट्या इंग्रजी शाळेने पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक केली. फी परत न मिळाल्याने डोळ्यात अश्रू. शिक्षण विभागाने शाळेविरोधात कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

Namdeo Kumbhar

संदीप नागरे, हिंगली प्रतिनिधी

Narayana English School denies refund to parent despite fake license : हिंगोलीत बोगस इंग्रजी शाळेने पोलीस कर्मचारी असलेल्या पालकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत भरलेले पैसे परत मिळत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. शाळेच्या समोरच पोलिस धायमोकलून रडत होता. राजकुमार सुर्वे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दोन्ही मुलांचे अॅडमिशन त्यांनी येथील नारायणा शाळेत केले होते. पण ही शाळा बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फी माघारी घेण्यासाठी आले पण पैसे न मिळाल्याने डोळ्यात अश्रू आले.

राज्यभरात इंग्रजी शाळांकडून पालकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघड झाले. आता हिंगोलीमध्ये देखील एका नामांकित इंग्रजी शाळेने पोलीस कर्मचारी असलेल्या पालकाची आर्थिक फसवणूक केली. राजकुमार सुर्वे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून सुर्वे यांनी आठ महिन्यापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलांचे प्रवेश हिंगोली शहरातील नारायणा इंग्लिश स्कूलमध्ये घेतले होते. मात्र प्रशासनाने ही शाळा नियमबाह्य ठरवल्याने सुर्वे यांनी तातडीने दोन्ही मुलांचे दुसऱ्या शाळेत ऍडमिशन केले. दरम्यान शाळा ही बोगस असल्याने आपल्या मुलांची भरलेली फीस परत मिळावी, यासाठी सुर्वे यांनी शाळेकडे मागणी केली. मात्र शाळेने कोणतीही फीस परत मिळत नसल्याचे सांगत सुर्वे यांना सुरक्षा गार्डच्या माध्यमातून शाळेच्या बाहेर काढले.

गेल्या आठ महिन्यापासून नोकरीच्या पगारातून भरलेले पैसे मिळत नसल्याने राजकुमार सुर्वे यांनी आता थेट शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी नारायणा इंग्लिश स्कूलवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा शाळेत मुलांच्या प्रवेशावेळी भरलेले पैसे मिळावे, यासाठी राजकुमार सुर्वे शाळेत दाखल झाले होते. यावेळी देखील शाळा व्यवस्थापनाने त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला. त्यामुळे सुर्वे यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. या सगळ्या प्रकारानंतर मात्र आता हिंगोलीच्या शिक्षण विभागाने नारायणा इंग्लिश स्कूलच्या विरोधात कार्यवाहीला सुरुवात केली. येत्या आठ दिवसात या शाळेला सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Board Exam : दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ! शाळा अन् महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत, पालकांची नाराजी

SCROLL FOR NEXT