अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक: राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आज दोन महीने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र भोंदूगिरीविरोधात मोठी लाट आली असून राज्यभरात तब्बल 35 भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या कारवाईची अधिकृत माहिती देत 35 भोंदू बाबांची संपूर्ण यादीच जाहीर केली आहे.
अंनिसने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या हायटेक आणि शहरी भागात देखील भोंदुगिरीचे मोठे प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत अनेक ठिकाणी पोलिसांनी थेट धाडी टाकून भोंदू बाबांचे दरबार उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
समोर आलेल्या प्रकरणांमध्ये धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीडित महिलांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधनाचे आमिष दाखवणे, आजार बरे करण्याचा दावा करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणे अशा गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे.
अंनिसने स्पष्ट केले की, अंधश्रद्धेचा फायदा घेणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो. कारवाई झालेल्या ३५ जणांमध्ये विविध धर्मातील भोंदू बाबा, मांत्रिक, पाद्री आणि हकीमांचा समावेश आहे. ढोंगी प्रवृत्तीविरोधातील हा लढा कोणत्याही एका धर्माविरुद्ध नसून, केवळ शोषणाविरुद्ध आहे, असा मोठा दावा अंनिसने केला आहे.
नाशिक विभाग:
१) अशोक कुमार खरात (नाशिक)
२) विठोबा वाल्मीक जाट (सातपूर, नाशिक)
३) महेशगिरी उर्फ महेश काकडे (लासलगाव, नाशिक)
४) चंद्रकांत राजेंद्र माळी (इगतपुरी, नाशिक)
पुणे आणि अहिल्यानगर परिसर
५) पंकज देवराम घोलप (येडगांव, पुणे)
६) नाना बर्डे (आळे फाटा, पुणे)
७) अनिल सोलोमन सिंग (पादरी - पुणे)
८) पिंटू धुमाळ (बारामती, पुणे)
९) औदुंबर गडदे (स्वारगेट, पुणे)
१०) नवनाथ गवळी (खेड, पुणे)
११) श्याम महाराज राठोड (दिघी, पुणे)
१२) किसन तळपे (मंदोशी, खेड)
१३) गडगेबाबा राजेंद्र गडगे (संगमनेर, अहिल्यानगर)
१४) गणेश शिंदे (श्रीरामपूर, अहिल्यानगर)
१५) अशोक मधुकर आढाव (श्रीरामपूर, अहिल्यानगर)
१६) शिव भाऊ सोनवणे (सर्जेपुरा, अहिल्यानगर)
१७) यशवंत एकनाथ थोरात (पारनेर, अहिल्यानगर)
मुंबई, ठाणे आणि कोकण विभाग:
१८) ऋषिकेश वैद्य (वसई, मुंबई)
१९) अल्ताफ रईस खान (मालाड, मुंबई)
२०) रिधम पांचाळ (मालाड, मुंबई)
२१) इरफान नियाज अहमद (कांदिवली, मुंबई)
२२) रमेश गुप्ता (मालाड, मुंबई)
२३) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा (नवी मुंबई)
२४) अब्दुल रशीद शेख (खालापूर, रायगड)
२५) शिवराम पराश सावर (पालघर)
२६) शाहिद शेख (खडकपाडा, कल्याण)
२७) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित (ठाणे)
सोलापूर आणि मराठवाडा विभाग:
२८) मोहन मामा भोसले (कुर्डुवाडी, सोलापूर)
२९) नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर (टेंभुर्णी, सोलापूर)
३०) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे (बिलोली, नांदेड)
३१) हरिगिरी दत्तगिरी महाराज (भाग्यनगर, नांदेड)
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र:
३२) चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला)
३३) हेमदास किसन बावणे (अड्याळ, भंडारा)
३४) अल्ताफ हसन मदारी (जळगाव)
३५) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते (पश्चिम देवपूर, धुळे)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.