Fake Godman  Saam tv
महाराष्ट्र

अमावस्येला पूजा करून महिलेसोबत अश्लील कृत्य, भोंदू भोसलेचं भयंकर कृत्य, सोलापूर हादरले

Manohar Bhosale, Solapur crime news : सोलापूरमधील भोंदू बाबा मनोहर भोसलेविरोधात लैंगिक अत्याचाराचा सहावा गुन्हा दाखल झाला आहे. अमावस्येच्या पूजेच्या बहाण्याने महिलेचा गैरवापर केल्याचा आरोप असून, एसआयटीकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Manohar Bhosale sexual assault case : सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध भोंदूबाबा मनोहर भोसलेविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात आता तब्बल सहावा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर करण्याचे आमिष दाखवून, तीन अमावस्यांना विशेष पूजा घालण्याच्या बहाण्याने मनोहर भोसले याने पैसे उकळले आणि महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मनोहर मामा भोसलेच्या विविध आश्रमांवर छापे टाकले असून, तिथून तपासाला गती देणारे काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक विशेष तपास समिती म्हणजेच SIT (Special Investigation Team) स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत मनोहर भोसलेची कसून चौकशी सुरू आहे.

३ कोटींचे संशयास्पद व्यवहार

या चौकशी दरम्यान भोंदू मनोहर भोसलेचे मोठे आर्थिक साम्राज्य देखील समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या २० हून अधिक बँक खात्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या पैशांचा स्त्रोत काय आणि हे पैसे कुठून आले, याचा शोध आता 'SIT' घेत आहे.

मनोहर भोसलेविरुद्ध आधी ५ गुन्हे दाखल होते, त्यात आता २ दिवसांपूर्वी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये सहावा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने तिच्या नातेवाईकांच्या आरोग्याच्या समस्येसाठी संपर्क साधला असता, दोन अमावस्यांना पूजा करण्यात आली आणि तिसऱ्या अमावस्येला आल्यावर तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याची तक्रार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. गोटी येथील मुख्य आश्रम अनधिकृत आणि बेकायदेशीर (Illegal) असल्याने ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार तो सील करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, गाणगापूर आणि कोल्हापूर येथील इतर आश्रमांवरही टीमने जाऊन पंचनामा केला असून तिथून काही पुरावे हस्तगत केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

SCROLL FOR NEXT