केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल; मेसेज वाचून अंगावर येईल काटा

Ketan Agrawal Death Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या कथित स्नॅपचॅट चॅट्स आणि दुसऱ्या मोबाईलमधील माहिती तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
Ketan Agrawal Murder Case
Ketan Agrawal Murder CaseSaam TV
Published On

सचिन जाधव | पुणे प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Ketan Agrawal murder case latest update : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील लोहगड किल्ला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याबाबत आता एक मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. सिया गोयल हिचे तिच्या मित्र आणि मैत्रिणींसोबतचे स्नॅपचॅट (Snapchat) वरील संभाषण आणि चॅट्स समोर आले आहेत. या चॅट्समध्ये तिने लग्नाबाबत केलेले एक धक्कादायक विधान समोर आले असून, तिने मैत्रिणीला "तुझे आधार कार्ड पाठवून दे, लग्नाचं तिकीट काढायचं आहे. लग्न होणार नाही, तरीही तुझं तिकीट काढून ठेवते," असा मेसेज केल्याचे उघड झाले आहे. या विधानामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला असून, या गुपिताचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

सिया गोयलचे हे चॅट्स समोर आल्यानंतर या हत्याकांडात आधीपासूनच काही मोठा कट रचला जात होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. ओळखीच्या मित्रांसोबत झालेल्या या संभाषणातून आता अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सिया गोयल हिचा दुसरा मोबाइलही मिळाला असून त्यामधील चॅट्स आणि कोडवर्ड पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Ketan Agrawal Murder Case
Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

"लग्नाचं तिकीट काढायचं आहे..." कथित चॅट उघड

व्हायरल होत असलेल्या एका कथित चॅटमध्ये सियाने तिच्या मैत्रिणीकडे ओळखपत्राची (आधार कार्ड) मागणी केल्याचा दावा केला जात आहे. "तुझे आधार कार्ड पाठवून दे, लग्नाचं तिकीट काढायचं आहे. लग्न होणार नाही, तरीही तुझं तिकीट काढून ठेवते," असा खळबळजनक मजकूर या चॅटमध्ये असल्याचे बोलले जात आहे. या संशयास्पद संभाषणामुळे हत्येचा कट आधीपासूनच रचला जात होता का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत; जुने व्हिडिओही व्हायरल

या हाय-प्रोफाईल हत्या प्रकरणात पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा सहआरोपी चेतन चौधरी या दोघांनाही न्यायालयाने सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सिया गोयलचे काही जुने व्हिडिओ आणि सोशल मीडिया रीलही मोठ्या प्रमाणात री-शेअर केले जात आहेत, ज्यामुळे नेटिझन्समध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ketan Agrawal Murder Case
पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुराव्यांवर भर

पुणे पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जप्त केलेले मोबाईल फोन, डिलिट केलेला डेटा, सोशल मीडिया चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक नोंदींची फॉरेन्सिक टीममार्फत कसून तपासणी केली जात आहे. या डिजिटल डेटाच्या विश्लेषणातून केतन अग्रवाल यांच्या मृत्यूचे गूढ लवकरच उकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ketan Agrawal Murder Case
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक प्रकृती बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com