चुकीच्या बातम्या करु नका; एखादी कमी पडली तर मला मागा- देवेंद्र फडणवीस Saam tv
महाराष्ट्र

मंदिर उघडण्याच्या प्रश्नावरून फडणवीस यांचा सरकारवर निशाणा

भारत नागणे

पंढरपूर : जेवढी गर्दी बार मध्ये होते, मॉल मध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे. आम्हाला जेथे आहे तेथे देव आहे. मात्र अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हार वाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी तरी मंदिरे उघडा, मंदिरे बंद ठेवणे सरकारची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता मात्र मंदिरे बंद ठेवता, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा -

आज सांगोला येथे कै.गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तसेच कै.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त पंढरपुरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

गणपतराव देशमुख यांचे विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शाळांच्या बाबत निर्णय घेण्यात सरकार धरसोड करत आहे. पालकांना व विद्यार्थाना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अखेर अक्षय शिंदेचा शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी संपन्न

Sambhajinagar News : मद्यधुंद कार चालकाची तीन कारला धडक; पाचजण झाले फरार, संभाजीनगरातील घटना

Pankaja Munde Blackmail : पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये तिकिटासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Manoj Jarange : ठाकरे, मुंडे, शिंदेंनतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणा

IND vs BAN: शुभमन गिल, रिषभ पंत अन् युजवेंद्र चहलला टी-२० संघात स्थान का नाही मिळालं? हे आहे कारण

SCROLL FOR NEXT