शेतकरी संदीप नागरे
महाराष्ट्र

हळद शिजवताना प्रेशर कुकरचा स्फोट; उकळते पाणी अंगावर पडल्याने 4 शेतकरी गंभीर जखमी

सध्या हळद काढणीचे काम जोमात सुरू असून, यासाठी मजूर रात्रीच्या सुमारास हळद शिजविण्याचे काम करत आहेत.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli) सेनगाव तालुक्यातील कहाकर गावामध्ये शेतात हळद शिजवत असताना हळद प्रेशरचा अचानक स्फोट होऊन चार मजूर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 2 मजुरांच्या अंगावर प्रेशर कुकर मधील उकळते पाणी उडाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून जखमींवर अकोला व वाशीम (Washim) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सद्या हिंगोली जिल्ह्यात हळद (Turmeric) काढणीचे काम जोमात सुरू असून, यासाठी मजूर रात्रीच्या सुमारास हळद शिजविण्याचे काम करत आहेत, आज सकाळच्या सुमारास कहाकर गावातील शेतकरी प्रभाकर पोळघट यांच्या शेतातील हळद या गावातील मजूर प्रेशर कुकरमध्ये शिजवत होते, या वेळी अचानक हा स्फोट झाला, या स्फोटाच्या आवाजाने अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaitanyanand Swami: विद्यार्थिनींना धमकावून चैतन्यानंद सरस्वतीकडे पाठवायच्या, इन्स्टिट्यूटच्या ३ महिला अधिकाऱ्यांना अटक

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

SCROLL FOR NEXT