औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) हे MIM ला महाविकास आघाडीसोबत घ्या याबाबतचा प्रस्ताव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.
महाविकास आघाडीसोबत MIM ला घ्या, असं आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केल्यानंतर शिवसेने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आम्ही कदापी MIM ला महाविकास आघाडीमध्ये घेणार नसल्य़ाचंही शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणूकीत एमआयएमने राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने आघाडीतीलच राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने ही आघाडी अशक्य असल्याचं म्हटंल आहे. मात्र, शिवसेनेचा तीव्र विरोध असताना देखील आता खासदार इम्तियाज जलील MIM ला महाविकास आघाडीसोबत घ्या याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) भेट घेऊन देणार असल्याचं सांगितलं आहे.
हे देखील पहा -
दरम्यान, याबाबत बोलताना एमआयएम चे माजी आमदार वारीस पठाण (Former MIM MLA Waris Pathan) यांनी सांगितलं की आम्हाला सतत हे लोक भाजपची बी टीम म्हणतात त्यामुळे आमच्या खासदानां आरोग्यमंत्री भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला पण आघाडीत घ्या असं सांगितलं आहे. त्यामुळे आमच्यावरती जर तुम्ही आरोप करताय तर एकत्रित मिळून आपण भाजपला हरवू असंही पठाण म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.