Coal Mine Explosion Saam Tv
महाराष्ट्र

Coal Mine Explosion: नागपूरच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट, 11 कामगार जखमी

11 पैकी सहा कामगार गंभीर जखमी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News Today: नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट झाला आहे. या स्फोटात 11 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वेकोलीच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीच्या सिम 2 आणि सेक्शन 6 मध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

11 पैकी सहा जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्यांच्यावर नागपुरात (Nagpur) उपचार सुरू आहे. खाणीतील कोळसा संपल्यावर ती जागा रेती किंवा भिंत बांधून बंद करणे आवश्यक असते, अन्यथा त्यात त्या पोकळीत वायू साचतो.हा वायू ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर स्फोट होतो. (Nagpur News)

सेक्शन 6 मध्ये कोळसा काढल्यावर ते कोळसा खान महिनाभरापासून बंद केले नव्हते. त्यामुळं त्यातील वायूचा ऑक्सिजन शी संपर्क आल्याने हा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT