What Decision Will Sharad Pawar Take On Resignation
What Decision Will Sharad Pawar Take On Resignation Saam TV
महाराष्ट्र

EXPLAINER: शरद पवार एक-दोन दिवसांत नेमका कोणता निर्णय घेऊ शकतात?

Satish Kengar

What Decision Will Sharad Pawar Take On Resignation: सध्या राज्यातील राजकारणातील केंद्र बिंदू ठरलेल्या शरद पवार यांनी आपल्या निर्णयाने सगळ्यांनाच हादरा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने फक्त राष्ट्रवादी पक्षच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांसह सामान्य माणसांनाही धक्का बसला आहे. गेल्या अनेक दशकांपासून राज्याचं राजकारण शरद पवार यांच्या अवतीभवती फिरत आहे. अशातच त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला.

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. यातच आज शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले आहेत की, ''दोन दिवसानंतर निर्णय सांगतो.''

त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांचं हे वक्तव्य आल्यानंतर अनेक लोकांचं म्हणणं आहे की, ते आपला निर्णय मागे घेणार. मात्र प्रश्न असा आहे की, दोन दिवसानंतर ते खरंच आपला राजीनामा मागे घेणार की आपल्या निर्णयावर कायम राहणार? तसेच यातून कोणता तिसरा मार्गही ते काढू शकता का? याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Latest Marathi News)

Will Sharad Pawar withdraw his decision? : शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का?

 शरद पवार यांनी आधीच आपण आपला निर्णय मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोध आणि आंदोलनंत त्यांनी यासंबंधित समिती जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं म्हटलं होतं. यातच आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपण दोन दिवसांत निर्णय घेऊ असं सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते आपला निर्णय मागे घेऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.

What will happen if Sharad Pawar does not withdraw his resignation? शरद पवार पदावर परतले नाही तर काय होणार?

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती पुढील निर्णय घेते. राष्ट्रीय कार्यकारणी आणि केंद्रीय निवडणूक समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यायची की नाही याबाबत चर्चा करेल. या दोन्ही समितींना राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता परस्पर चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दोन्ही समितींमध्ये अध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली तर राष्ट्रीय कार्यकारणीची तत्काळ बैठक बोलवली जाईल.

राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता एकमुखी निर्णय घेऊ शकतात. कमिटीला तसा अधिकार देण्यात आला आहे. कमिटी शिफारस करेल त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत कमिटी प्रभारी अध्यक्ष देखील नेमू शकते. राष्ट्रीय अधिवेशन पार पडल्यानंतर अध्यक्षपदाची घोषणा अधिवेशनात केली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणी समितीला विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ पक्ष हितासाठी प्रभारी अध्यक्ष न नेमता थेट अध्यक्ष नेमण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे.

Who will be the new president of NCP? कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?

राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने तीन नावे समोर येत आहेत. यात पहिलं नाव सुप्रिया सुळे यांचं असून दुसरं नाव हे अजित पवार यांचं आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेल यांचं नाव ही चर्चेत आहे. यातच नुकताच सकाळ-साम सर्व्हे करण्यात आला होता. यात प्रश्न विचारण्यात आला होता की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कुणाला पसंती द्याल? यात सुप्रिया सुळे यांच्या नावाला ३५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. तर अजित पवार यांच्या नावाला ३२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला १७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक 3 वर्षांनंतर नव्या अध्यक्षाची निवड केली जाते. सध्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्याने अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केवळ 8 महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. पक्षाच्या घटनेनुसार कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती पुढील निर्णय घेऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

SCROLL FOR NEXT