Sharad Pawar Resigns Latest Update: शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
आज याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला आहे. 'दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावा लागणार नाही', असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले आहेत की, "जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. उद्या पक्षाचं कामकाज असं चालावं, त्यातून नवीन नेतृत्व मजबूत करावं हा माझा हेतू होता, असे निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती, पण ती माझ्याकडून घेतली गेली नाही.'' (Latest Marathi News)
पवार म्हणाले की, ''आता हा जो निर्णय घेतला त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून जे लोक आले त्यांनी सांगू इच्छितो की, संध्याकाळी मी बैठक घेईल, त्यानंतर अंतिम निर्णय एक ते दोन दिवसात घेऊ. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही.''
दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करत होते. काहींनी आपल्या रक्ताने शरद पवार यांना निर्णय मागे पत्र लिहिले. हे सगळं पाहून शरद पवार हे आंदोलकांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना दोन दिवसानंतर निर्णय सांगतो, असं सांगितलं. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जोश पाहायला मिळाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.