पुणे - कोरोनामुळे (Covid19) अनाथ (Orphan) झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी ( परीक्षा फी) माफ (waive) करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मंडळाने शनिवारी ठराव मंजूर केला. गेल्या दीड वर्षांपासून देशभराच कोरोना महामारीमुळे अनेक मुलांनी आपले पालक (guardian) गमावले आहेत. अशा परिस्थितील आई किंवा वडील किंवा दोन्हीपैकी एक पालक गमावलेल्या, विभाग किंवा संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, जर त्यांच्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली गेली असेल तर ती त्यांनां परत केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. (Examination fee waived for students orphaned in Corona epidemic)
कित्येक महिन्यांपासून विद्यार्थी कार्यकर्ते सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ करावे किंवा कमी करण्याची मागणी करत आहेत. कोरोना महामारीत विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे. अशातच त्यांच्यावर फी भरण्यासाठीदेखील दबाव आणला जात आहे. यातील बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहे. तर काही लहान शहरांमधील असल्याने त्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना कारावा लागत आहे. अलीकडेच एसपीपीयूने महाविद्यालयांना निर्देश दिले होते की फी भरणे परवडणार नाही अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यास नकार देऊ नका. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क भरणे परडणार नाही त्यांच्या परिक्षेचे अर्ज नाकारु नये, अशा सुचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या होत्या.
तथापि, विद्यापीठाचे स्वतःचा मोठा निधी हा परीक्षेशी संबंधित फीवर अवलंबून असतो. त्यामुळे परिक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सोपा नसतो. असे विद्यापीठाच्या अधिका-यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांच्या क्रीडा संकुलातील काम जुलैच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देशही व्यवस्थापन परिषदेने शनिवारी प्रशासनाला दिले. विद्यार्थी आणि खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा देणाऱ्या क्रीडा संकुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 400 मीटर अॅथलेटिक रनिंग ट्रॅक असेल. तसेच श्री छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, इनडोअर स्पोर्ट्स रेंज आणि इतर अशा या नंतरचा दुसरा ट्रॅक असेल.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.