26 एकर जमीन झाली बाप्पांच्या नावावर !

बीड शहराचं आराध्य दैवत असणाऱ्या, नामलगाव येथील गणपती देवस्थानाची तब्बल 26 एकर जमीन, भाऊसाहेब हनुमान सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर, अविनाश लकुळ नवले या तिघांनी नावावर केली होती.
26 एकर जमीन झाली बाप्पांच्या नावावर !
26 एकर जमीन झाली बाप्पांच्या नावावर !विनोद जिरे

विनोद जिरे

बीड - बीड शहराचं आराध्य दैवत असणाऱ्या, नामलगाव येथील गणपती देवस्थानाची तब्बल 26 एकर जमीन, भाऊसाहेब हनुमान सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर, अविनाश लकुळ नवले या तिघांनी नावावर केली होती. एका रात्रीत या तिघांनी 2018 च्या बोगस आदेशाच्या आधारे, मंडळाधिकारी आणि तलाठ्याला हाताशी धरून ही जमीन नावावर केली होती. 26 acres of land in the name of Bappa!

हे देखील पहा -

तर हा सर्व प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता. त्यानंतर प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आणि या प्रकरणाची चौकशी लागली. अखेर साम टीव्हीच्या दणक्यानं गणपती देवस्थानाच्या त्या 26 एकर जमिनीवर लागलेले, खाजगी लोकांच्या नावाचे बनावट फेर रद्द करण्यात आले असून पुन्हा गणपती देवस्थानाच्या नावे ही जमीन करण्यात आली आहे.

26 एकर जमीन झाली बाप्पांच्या नावावर !
आरक्षणाच्या मुद्यावरून गोटेंनी पत्रकातून साधला फडणवीसांवर निशाणा

बीड जिल्ह्यात सध्या इनाम जमीन घोटाळा चांगलाच गाजत आहे. जिल्ह्यात 27 हजार एक्कर जमीन विविध देवस्थान, मस्जिद, दर्गा यांच्या नावे नोंदणीकृत आहेत. मात्र या इनाम जमीनीवर जिल्ह्यातील अनेक राजकीय अन धनदांडग्या लोकांनी डल्ला मारल्याचा तक्रारी शासन दरबारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे या सार्वजनिक जमिनी बेकायदा हस्तांतरण करण्यास, प्रशासनातली काही अतिउत्सुक मंडळी देखील सहभागी असल्याचे नामलगाव गणपती मंदिरांच्या प्रकरणावरुन दिसून आलं आहे.

काय आहे हे प्रकरण ?

बीड Beed तालुक्यातील नामलगाव Namalgaon येथील गणपती Ganpati देवस्थानाच्या मालकीची, घोसापुरी शिवारात 26 एक्कर जमिन Land आहे. या जमिनीवरील गणपती देवस्थानचे नाव कमी करुन, भाऊसाहेब हनुमान सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर, अविनाश लकुळ नवले या खाजगी तीन लोकांचे नाव लावण्याचे आदेश उप जिल्हाधिकारी (भु-सुधार) यांनी दिनांक 06 मार्च 2018 रोजी तलाठी यांना दिले होते. 2018 ला निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दि.22 मे 2021 ला करुन नामलगाव गणपती मंदिराचे नाव कमी करुन त्या खाजगी तीन लोकांचे नाव लावले होते.

हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यातून संताप व्यक्त केला जात होता. आणि हाच सर्व प्रकार साम टिव्हीने समोर आणला होता. त्यानंतर याची चौकशी सुरु झाली. या चौकशीत उप जिल्हाधिकारी (भु-सुधार) प्रकाश आघाव पाटील यांनी, 2018 रोजी काढलेले ते आदेश बोगस असल्याचा अहवाल पत्र, उप विभागीय अधिकारी यांना देऊन खळबळ उडवली.

त्यानंतर या प्रकरणाने प्रशासनाची झोपच उडवली. एक ना अनेक बोगस प्रकरणे बॅक डेटमध्ये झाल्याचे उघडकीस येऊ लागली. जिल्हा ते मंत्रालयापर्यंत देवस्थान इनाम जमीन घोटाळा गाजला. त्यानंतर दिनांक 17 जून 2021 रोजी उप विभागीय अधिकारी यांनी याप्रकरणात सुनावणी घेतली.

यामध्ये 2018 रोजी उपजिल्हाधिकारी भु-सुधार यांच्याकडून झालेल्या आदेशावर, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी अनियमितता केल्याचा ठपका ठेऊन, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी घेतलेला फेर बेकायदेशीर ठरवत तो रद्द केल्याचा आदेश काढला. त्याच काढलेल्या आदेशान्वये काल 26 जून 2021 रोजी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्या तिघांच्या नावे केलेला फेर रद्द करून देवस्थानच्या नावाचा फेर घेऊन देवस्थाचे नाव पूर्ववत सातबाऱ्यावर घेतलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com