Shiv Sena MP Targets Centre Over Missing Jagdeep Dhankhar Saam Tv News
महाराष्ट्र

माजी उपराष्ट्रपती २१ जुलैपासून बेपत्ता, बड्या खासदाराला वेगळाच संशय; देशाच्या राजकारणात खळबळ

Shiv Sena MP Targets Centre Over Missing Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड २१ जुलैपासून बेपत्ता. संजय राऊतांनी केंद्रावर थेट आरोप. 'रशिया पॅटर्न'ने नेते गायब करण्याचा संशय

Bhagyashree Kamble

  • जगदीप धनखड २१ जुलैपासून बेपत्ता

  • संजय राऊतांनी केंद्रावर थेट आरोप

  • 'रशिया पॅटर्न'ने नेते गायब करण्याचा संशय

  • सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त

जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची स्थिती काय? ते नेमके कुणासोबत आहेत? याबाबत अद्याप कुणालाही कोणतीही अधिकृत माहिती नाही. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. जगदीप धनखड यांना कुठेतरी गायब केले आहे का? अशी शंका त्यांनी उपस्थित केला आहे.

राऊत म्हणाले की, '२१ जुलैला सकाळी राज्यसभेत धनखड साहेब आमच्यासमोर होते. प्रकृती उत्तम होती, संवादही झाला. त्यांनी राज्यसभेत काही आदेश दिले. नंतर सभागृह स्थगित झालं. त्यावेळेस त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र, संध्याकाळी सहा वाजता अचानक मीडियावर बातमी आली की त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. हे धक्कादायक आहे', असं संजय राऊत म्हणाले.

रशिया पॅटर्नचा संशय

'इथपर्यंत आम्ही सगळं सहन करू शकतो. पण धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ते कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, ते काय आणि कुणासोबत आहेत? त्यांचा मुक्काम नेमका कुठे आहे? त्यांना कुणी गायब केलंय? अशा शंका आमच्या मनात येत आहेत. देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठावठिकाणा लागत नसेल तर, लोकशाहीच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब आहे', असं राऊत म्हणाले.

'आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे. त्यांच्या काही पंरपरा या लोकांनी सुरू केली आहे का?', असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेतली. आम्ही या विषयावर चर्चा केली. जगदीप धनखड यांच्याविषयी चर्चा झाली. लोक जेव्हा अशा प्रकारे मिळत नसतील तर, आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो, असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 11 हजार दिव्यांनी लखलखला अंबड येथील मत्स्योदरी देवीचा परिसर,दीपोत्सवासाठी परदेशी पाहुण्याची हजेरी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT