सातारा : व्यसनमुक्त युवक संघच्या आंदाेलनात सहभागी झालेले ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांच्यावर पाेलिसांनी दाेन गुन्हे दाखल केले हाेते. आज (बुधवार) सातारा शहर पाेलिसांत बंडातात्या आले हाेते. त्यांची सुमारे २० मिनीट चाैकशी झाली. त्यानंतर ते नियाेजीत कार्यक्रमांना निघून गेले. (bandatatya karadkar latest marathi news)
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री या राज्य सरकारच्या निर्णयाविराेधात व्यसनमुक्त युवक संघ नुकत्याच केलेल्या आंदाेलनानंतर ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांच्यावर दाेन गुन्हे दाखल झाले हाेते. त्यानंतर पिंप्रद (ता. फलटण) येथून बंडातात्या कराडकर यांनी (bandatatya karadkar in satara police station) सातारा (satara) शहर पाेलिसांत येऊन तपासास सहकार्य केले. दरम्यान आज (बुधवार) पुन्हा पाेलिसांनी बंडातात्या कराडकरांना पाेलिस ठाण्यात बाेलावले हाेते. त्यानूसार ते आज शहर पाेलिस ठाण्यात आले हाेते.
दरम्यान आज नेमकी काय चाैकशी झाली याची माहिती तेथील कार्यरत असणा-या पाेलिसांना विचारलं असता त्यांनी वरिष्ठ पाेलिस अधिकारी देतील नंतर असं नमूद केले. बंडातात्या कराडकर यांचे वकील संग्राम मुंढेकर (advocate sangram mundekar) यांच्याशी साम टीव्हीच्या प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता. मुंढेकर म्हणाले हे नियमीत कामकाज आहे. तात्या आज शहर पाेलिसांत आले हाेते. तात्यांनी पाेलिसांनी (police) प्राॅमिस केल्याप्रमाणे ते त्यांच्यावरील दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील तपासात पुर्णत: सहकार्य करीत आहेत. तात्यांची सुमारे २० ते २५ मिनीट चाैकशी झाली. या चाैकशीनंतर तात्या त्यांचे नियाेजीत कार्यक्रमांना निघून गेलं. चाैकशीत काय प्रश्न पाेलिसांनी विचारले यावर मुंढेकर यांनी तात्यांनी दिलेल्या उत्तराने पाेलिसांचे समाधान झाल्याचं नमूद करीत अधिक बाेलणं टाळलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.