Shiv Sena (Shinde Group) Joins Hands with Patit Pawan Sanghatana Saam
महाराष्ट्र

पुण्यात शिंदे सेनेला नव्या भिडूची साथ; फडणवीस - पवार यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, युतीची घोषणा

Shiv Sena (Shinde Group) Joins Hands with Patit Pawan Sanghatana: पुण्यात शिवसेना शिंदेसेनेची ताकद वाढली. पतित पावन संघटनेशी युती. राजकीय समीकरणाच मोठा बदल.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात शिंदेसेना आणि पतित पावन संघटनेची युती.

  • आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात बदल.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेळावा पार.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महायुतीतील नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहेत. दरम्यान पुण्यात शिवसेना शिंदे गटाकडून मोठी राजकीय खेळी खेळण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जवळीक असणाऱ्या पतित पावन संघटनेशी शिवसेनेनं युती केली आहे. युती केल्यानंतर त्यांनी पुण्यात रविवारी मेळावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

'शिवसेनेनं आतापर्यंत अनेत मित्र जोडले आहेत. युतीही केली आहे. मात्र, पतित पावन संघटनेसोबतची युती ही आगळीवेगळी आहे', असं एकनाथ शिंदे म्हणाले. रविवारी पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीरंद बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार विजय शिवतारे आदी मंडळी उपस्थित होती.

या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'शिवसेना आणि पतित पावन संघटना हे दोन्ही भगव्या रंगाचे प्रवास एकत्र आले आहेत. खरंतर हिंदुत्वासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. हिंदुत्वाचा मुद्दा तसेच मराठी बाणा, या दोन्ही गोष्टी जपणाऱ्या काही मोजक्या संघटना उरल्या आहेत. गर्व से कहो हम हिंदू हैं, हा नारा शिवसेनेचाच होता.', असं एकनाथ शिंदे म्हणाले.

'शिवसेनेनं आतापर्यंत अनेक मित्र जोडले आहेत. बऱ्याच युती केल्या आहेत. मात्र, पतित पावन संघटनेसोबत झालेली युती आगळी वेगळी आहे', असं एकनाथ शिंदे म्हणाले. या युतीमुळे पुण्यात एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती शिवसेनेसाठी महत्वाची ठरेल, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

Surya Gochar: जानेवारीत सूर्य ग्रह करणार २ वेळा गोचर; 'या' राशींना लागणार जॅकपॉट, मिळणार भरपूर पैसा

Women Cricket History: भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या इतिहास

Silver Price: इतिहासात पहिल्यांदाच चांदी २ लाखांच्या पार, सोनं महागलं, आता पुढे काय?

कल्याणमध्ये अपघाताचा थरार; बायकोला कामावरून घरी आणताना विपरीत घडलं, दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT