शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरन सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आज होणारी सुनावणी होऊ शकली नाही. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचा निकाल आणखी काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील प्रकरणावर नियमित सुनावणी होणार होती. पीठातील न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. न्यायमूर्तींच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाचे कामकाज होऊ शकले नाही आणि पर्यायाने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
आजच्या सुनावणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'शिंवसेने'चे वकील आपली बाजू मांडणार होते आणि जोरदार युक्तिवाद होणार होता. मात्र, सुनावणी रद्द झाल्यामुळे त्यांना आता पुढील तारखेची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेचे नाव आणि अधिकृत 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला या कायदेशीर लढाईत आव्हान देण्यात आले आहे.
सध्या या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांवर न्यायालयाचा रोख आहे. आज शिंदे गटाकडून होणाऱ्या युक्तिवादाकडे संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागले होते. पण न्यायमूर्तींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनावणी नवीन तारीख मिळेपर्यंत लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच या प्रकरणाची नवीन तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.