Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra Ladki Bahin Scheme: लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Ladki Bahin Yojana
Augest installment ladki bahin yojanameta ai
Published On: 

लाडक्या बहि‍णींचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून लाडकी बहीण योजने सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता दरमहा जमा केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या सोशल मीडियावर सप्टेंबर महिन्यापासून २१०० रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची आणि ५ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय झाल्याची माहिती व्हायरल होत आहे. याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न होते. त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३३९ कोटींचा निधी मंजूर

लाडकी बहीण योजनेतल्या अनुसूचित जाती घटकातल्या पात्र महिलांना ऑगस्ट २०२६ महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य सरकारने ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने याच्याशी संबंधित आदेश काढून हा निधी महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केला आहे.

Ladki Bahin Yojana
Jio Recharge : 84 दिवसांची वैधता अन् रोज 2GB डेटा! Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतंय मोठं सरप्राइज

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली केलेली आहे. याच निधीतून ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यासाठी ३३९ कोटी १४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

लाभार्थी महिलांची छाननी होणार

लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी लाभार्थ्यांची छाननी करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले आहेत. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या ठरवून त्यानुसार निधी वितरित करायला सांगितला आहे. उपलब्ध निधीचा वापर संबंधित पात्र लाभार्थ्यांसाठीच करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

२१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

सध्या सोशल मीडियावर सप्टेंबर महिन्यापासून २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचं संदेश फिरत आहेत. मात्र, योजनेतल्या मासिक आर्थिक लाभ १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याबाबत किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्याबाबत ५ ऑक्टोबर रोजी कोणताही अधिकृत शासन निर्णय जारी झालेला नसल्याचं सरकाच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात आता २,१०० रुपये जमा होणार असल्याचा दावा सध्या अधिकृत माहितीवर आधारित नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com