eknath shinde  EknathShindeTwitter/SaamTV
महाराष्ट्र

Eknath Shinde : महायुतीमध्ये भूकंप? एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत

Eknath Shinde Press Conference : मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यातच एकनाथ शिंदे बाहेरुन पाठिंबा देणार असल्याचे समजतेय. तीन वाजता एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde vs Devendra fadnavis : मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रिपद हवे आहे. एकनाथ शिंदे मागे हटण्यास तयार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात. महायुतीला एकनाथ शिंदे बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद आणि केंद्रातील मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेंनी ही ऑफर नाकारत नवी ऑफऱ दिली. शिंदेंनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजतेय.

मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमधील दावे-प्रतिदावे समोर येत आहेत. त्यातच आज एकनाथ शिंदे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी तीन वाजता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.

विधानसभेला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकांनी महायुतीला एकहाती सत्ता दिली. चार दिवस उलटले पण महायुतीकडून अद्याप मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना महायुतीमधील १७८ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे पत्र भाजपला देण्यात आलेय. त्यामुळे भाजपकडे आता स्पष्ट बहुमत झालेय.

एकनाथ शिंदे यांच्या दबावतंत्राला भाजपने खोडून काढत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव पुढे केल्याचं समजतेय. राज्यात या राजकीय घडामोडी सुरु असताना एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेत आहे. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? महायुतीमधून बाहेर पडणार? बाहेरुन पाठिंबा देणार? की उपमुख्यमंत्री म्हणून अन्य कुणाचे नाव समोर करणार? याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT