Eknath Shinde PC Live : महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटलाय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि महायुतीबाबत आपला निर्णय सांगितला. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांचं अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येईल, असे मनात घेऊ नका, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, असे मोदींना फोनवर सांगितल्याचं एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
मी पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. मी सांगितलं की सरकार बनवताना कुठलं काही अडचणीचं आहे असं वाटलं तर कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षे संधी दिली. तुम्ही निर्णय घ्या...तो निर्णय मला महायुतीचे प्रमुख म्हणून ...तुम्ही घेतलेला निर्णय़ भाजपसाठी तसा आमच्यासाठी अंतिम आहे.
एकनाथ शिंदे अडसर नाही. काल मोदींना फोन केला. अमित शहांना केला. माझ्या भावना सांगितल्या. माझा कुठलाही अडसर ठेवू नका...तुम्ही निर्णय घ्या तो मला मान्य असेल. महायुती म्हणून काम करायचं आहे. जबाबदारी वाढलीये. महायुती म्हणून कौल दिलाय त्याचा आदर ठेवून जे काम केलंय. आणखी निर्णय घ्यायचे आहेत, असे शिंदे म्हणाले.
भाजप, वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील. मुख्यमंत्री करण्यासाठी त्याला पूर्ण शिवसेनेचे समर्थन आहे. पूर्ण पाठिंबा आहे. भाजपचा आणि आमची बैठक होईल. जे ठरेल ते मान्य. कुठलीही कोंडी, अडसर, नाराजी काही नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.