Eknath SHinde vs uddhav thackeray Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra politics : शिंदेंचं महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर, आमदार-खासदार गळाला लागणार? ठाकरेंच्या शिवसेनेत धाकधूक

What is Operation Tiger in Maharashtra politics? एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Operation Tiger Maharashtra political plan details : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदेंनी मोदी-शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. निम्मे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश होणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि वेळ जवळपास निश्चित झाली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. मोदींसोबत झालेल्या भेटींमध्ये खासदाराच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. ऑपरेशन टायगर राबवत शिवसेनेची दिल्लीतील ताकद वाढवण्याचा मानस शिंदेंच्या शिवसेनेचा असल्याचे समजतेय. ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये काही खासदारांचा समावेश आहे. त्याशिवाय काही माजी आमदार, खासदारही शिंदेंच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. शिंदेंच्या सोबत उदय सामंतही दिल्लीमध्ये होते. हा दौरा फक्त आमच्या खासदारांना मार्गदर्शन कऱण्यासाठी आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी होता, असे सामंत यांनी सांगितलं.

ठाकरेंना पुन्हा धक्का देणार शिंदे?

शिवसेनेच प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. ते शिंदेसेनेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेंनी आपल्या ७ खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यामध्ये ठाकरेंच्या खासदारांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाली. एकनाथ शिंदेंनी मोदींना खासदारांची नावे सांगतील. या भेटीमध्ये कायदेशीर प्रक्रियावर चर्चा झाली. योग्य वेळ आल्यावर खासदारांचा पक्ष प्रवेश चर्चा केली जाईल. शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात कायदेशीर प्रक्रियांची चर्चा झाली. त्यानंतरच महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा का?

महाराष्ट्रात शिंदेसेना आणि भाजप युतीने भरघोस यश मिळवले. विधानसभेपासून महापालिका, जिल्हा परिषदा अन् नगरपरिषदेत महायुतीला यश मिळाले. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील सत्ता गमावली. बीएमसीवर पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळवले. त्यातच आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेत धाकधूक वाढली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून याच संधीचा फायदा घेत ऑपरेशनटायगर राबवले जात आहे. ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावत शिंदे दिल्लीमधील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे-उदय सामंत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिदेंच्या शिवसेनं वृत्त फेटाळलं, पण ठाकरे गटात धाकधूक कायम

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गळाला लागण्याचे वृत्त शिंदेंच्या शिवसेनेकडून फेटाळण्यात आले आहे. शिंदेंसोबत दिल्ली दौऱ्यावर गेलेले शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा 'ऑपरेशन टायगर'शी काहीही संबंध नाही. हा दौरा केवळ खासदारांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होता.

शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर फेटाळण्यात आले, तरीही ठाकरेंच्या शिवसेनेत धाकधूक कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे. जिल्हा परिषद ते महानगरपालिका आणि नगर परिषद या सर्व निवडणुकीत त्यांना हवं तसं यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते अस्वस्थ आहेत. त्यांना राजकीय भवितव्याची चिंता वाटत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून गुढी पाडव्याचा टिझर जारी

Ladki Bahin Yojana: पुण्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी, ८३ टक्के विवाहित महिला घेतायत लाभ, आकडेवारी समोर

Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! आणखी एक डबल डेकर उड्डाणपूल होणार, मुंढवा-खराडी ट्रॅफिकची कटकट संपणार

Long Hair Hairstyles: लांब केसांवर उठून दिसतील या 5 हेअरस्टाईल्स, साडी व ड्रेसमध्ये दिसाल भारी

Saree For Summer : कडक उन्हातही मिळेल आराम; डेलीवेअरसाठी नेसा 'या' सुंदर साड्या, डिझाइन्स आहेत खूपच खास

SCROLL FOR NEXT