Santosh Bangar Aggressive video Saam TV
महाराष्ट्र

Santosh Banger: ...अन्यथा माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही; आमदार संतोष बांगर अधिकाऱ्यावर भडकले, पाहा VIDEO

Mla Santosh Bangar video: शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे दिले नाहीत, तर माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही, असा सज्जड दम बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Satish Daud

Santosh Bangar Aggressive video

शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर नेहमी आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात. सरकारी अधिकाऱ्यांना फोनवरून दमदाटी करणं, तसेच शिवराळ भाषा वापरून त्यांना सज्जड दम देणं, असे बांगर यांचे अनेक व्हिडीओ आजवर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरून अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केलीये. अशातच संतोष बांगर यांचा पुन्हा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडीओत संतोष बांगर यांनी चक्क कृषी अधीक्षकांनाच धमकी देताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे दिले नाहीत, तर माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही, असा सज्जड दम बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

अवकाळी पाऊस तसेच दुष्काळामुळे हिंगोलीत शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे मिळावे यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिंजवत आहेत. अशातच पीकविम्याचे पैसा मिळावे यासाठी हिंगोलीतील काही शेतकऱ्यांनी संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली होती.

यावरून संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी थेट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयात धडक दिली. चार दिवसात शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे खात्यावर जमा करा, अन्यथा माझ्या एवढा वाईट कोणी नाही, असा सज्जड दम संतोष बांगर यांनी हिंगोलीचे कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांना दिला.

इतकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नाही, तर कृषी कार्यालयात शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा देखील आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींनी संतोष बांगर यांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन दिलंय.

तर काहींनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. दरम्यान, घोरपडे यांच्या आडमुठेपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पिक विमा कंपनीकडून नाकारण्यात आली आहे, असा आरोप देखील आमदार संतोष बांगर यांनी यावेळी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: दिवाळीपूर्वी गुरु करणार कर्क राशीत गोचर; 18 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, सलग चारवेळा अपयश; शेवटच्या प्रयत्नात UPSC क्रॅक; फॅक्टरी कामगाराची लेकी झाली IPS

Budh Gochar: आजपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; बुध करणार शुक्राच्या तूळ राशी एन्ट्री

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी तब्येत जपणं आज गरजेचे आहे; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT